Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

एसटी बसच्या अपघातात एक जखमी

पाथर्डी शहरातील घटना । जखमींच्या पायाचा चेंदामेंदा

पाथर्डी । वीरभूमी- Apr 03, 2023 • 11:17 PM 2640 views

पाथर्डी शहरातील जुन्या बसस्थानक परिसरातील स्व. वसंतराव नाईक चौकात सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एसटी बसच्या चाकाखाली येऊन एका इसमाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. राजेंद्र मर्दाने (रा. कसबा पेठ, पाथर्डी) असे एसटीच्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

राजेंद्र मर्दाने यांच्या डाव्या पायावरून एसटी बसचे पुढील चाक गेल्याने गुडघ्याच्या खालील पायाचा भाग अक्षरशा चंदामेंदा झाला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी आगाराची एसटी बस ही पाथर्डीच्या जुन्या बस स्थानकावरून बाहेर पडताना स्व. वसंतराव नाईक चौकात जागेवरच असलेल्या वळणावर हा अपघात घडला. सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झालेला आहे.

पाथर्डी व इतर आगाराच्या एसटी बसेसला पाथर्डीच्या जुन्या बसस्थानकातून बाहेर पडण्यासाठी अतिक्रमणे व खाजगी वाहनांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यातून अशा छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत. शहराच्या मुख्य चौकात अपघात झाल्याने कल्याण निर्मल (विशाखापट्टणम) हा शहरातून जाणार्‍या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर रसाळ, संदीप बडे, संजय बडे हे  घटनास्थळी दाखल झाले होते. जखमी राजेंद्र मर्दाने यांना तातडीने पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply