Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

दिग्गजांच्या उमेदवारीने निवडणूक गाजणार

श्रीगोंदा बाजार समिती निवडणुकीतील चित्र । साजन पाचपुते, मितेश नाहाटा यांचे उमेदवारी अर्ज आल्याने विरोधकांची धावपळ

विजय उंडे । वीरभूमी- Apr 03, 2023 • 11:32 PM 2402 views

श्रीगोंदा ः श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत रंगत वाढत चालली असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (3 एप्रिल रोजी) विक्रमी 281 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या प्रमुखांमध्ये काष्टीचे सरपंच साजन पाचपुते, महाराष्ट्र आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा, त्यांचे चिरंजीव मितेश नहाटा, जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे, पंचायत समितीच्या माजी सभापती अर्चना पानसरे, बाजार समितीचे विद्यमान चेअरमन संजय जामदार, माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक वैभव पाचपुते, शेतकरी नेते राजेंद्र मस्के, माजी नगराध्यक्षा छाया गोरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांच्या उमेदवारीमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक प्रथमतः मोठ्या प्रमाणात गाजण्याची चिन्हे आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील नेत्यांनी तालुका स्तरावरील अनेक संस्था सहमती पॅनलच्या नावाखाली बिनविरोध केल्या. सहमतीच्या नावाखाली आपल्याच बगलबच्चांना संधी देऊन तेच तेच चेहरे मतदारांवर लादल्यामुळे तालुक्यातील चळवळीतील कार्यकर्त्यांनी चिडून बाजार समितीच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात विक्रमी अर्ज दाखल केल्याने आता बिनविरोधच्या आशा मावळल्या आहेत.

 नेत्यांनी ऐनवेळी कितीही सहमती करण्याचा प्रयत्न केला तरी निवडणुक बिनविरोध होऊच शकत नाही. असे स्पष्ट या विक्रमी निवडणुक अर्जांवरून जाणवते. या निवडणुकीचे वैशिष्टय म्हणजे सर्व पॅनलकडून आर्थिकदृष्ट्या तगडे उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. सातत्याने निवडणुका बिनविरोध होत असल्याने बिनविरोधच्या नावाखाली मलिदा घेऊन उमेदवारी अर्ज माघारी घेणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा चंगळवादी उमेदवारांनी आपले अर्ज वेगवेगळ्या ठिकाणी भरले आहेत. ही निवडणूक चुरशीची ठरणार यात तिळमात्र शंका नाही.

दिवसा एका नेत्याबरोबर दिसणारे कार्यकर्ते रात्री दुसर्‍या नेत्यांच्या खलबतात व्यस्त : श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात विशेषतः मार्केट कमिटीच्या निवडणुकीत अनेक इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते दिवसा आपल्या नेत्यांबरोबर राहून निष्ठावानाचा आव आणतात. मात्र रात्री दुसर्‍या नेत्यांबरोबर खलबते करून सोज्वळतेचा रंग पांघरतात. हेच कार्यकर्ते आपल्या नेत्याचा कधी ‘घाटात दिवस मावळवतील’ याचा भरोसा सध्या तरी कुणी देऊ शकत नाही.

इच्छुकांच्या भाऊगर्दीने उच्चांकी उमेदवारी अर्ज दाखल : सहकारी संस्था मतदारसंघांमध्ये सर्वसाधारण 7, महिला प्रतिनीधी 2, इतर मागास प्रवर्ग 1 व भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी 1 अशा 11 जागांसाठी एकूण 191 अर्ज दाखल, ग्रामपंचायत मतदार संघामध्ये सर्वसाधारण 2, अनुसुचित जाती जमातीसाठी 1 व भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी 1 अशा 4 जागांसाठी एकूण 66 अर्ज दाखल, आडते व्यापारी मतदारसंघांमध्ये एकूण 2 जागेसाठी 18 अर्ज दाखल तर हमाल मापाडी मतदारसंघांमध्ये 1 जागेसाठी 6 अर्ज दाखल झाले आहेत. असे एकूण 18 जागांसाठी 281 विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply