Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

माजी आ. वैभवराव पिचड यांच्या शब्दाला सत्ताधार्‍यांनी दिला मान...

सुनीताताई  भांगरे झाल्या अगस्ति साखर कारखान्याच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष

अकोले । वीरभूमी - Apr 06, 2023 • 03:59 PM 2241 views

अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष स्व. अशोकराव भांगरे यांच्या रिक्त झालेल्या पदावर भांगरे कुटुंबातील सदस्यास संधी द्यावी, आम्ही आमचा उमेदवार त्यांच्या विरोधात उभा करणार नाही, असे सूतोवाच  माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केल्याने स्व. अशोकराव भांगरे यांच्या रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदी  स्व.अशोकराव भांगरे यांच्या पत्नी सुनीताताई भांगरे यांची अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाने बिनविरोध निवड केली.  

यावेळी ज्येष्ठ संचालक मिनानाथ पांडे यांनी सुनिताताई भांगरे यांच्या नावाची सूचना मांडली तर त्यास जेष्ठ संचालक मच्छिंद्र धुमाळ यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री.भालेराव साहेब, प्रादेशिक सह संचालक (साखर) अहमदनगर यांनी काम पाहिले. या निवडीनंतर आ.डॉ.किरण लहामटे आणि चेअरमन सिताराम पा.गायकर यांनी सत्कार करून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

सहकारी साखर कारखाण्याच्या उपाध्यक्षपदी सुनीताताई भांगरे यांना अहमदनगर जिल्ह्यात व अकोले तालुक्यात अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात प्रथमच विराजमान होण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे महिला वर्गात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी आ. डॉ. किरण लहामटे, चेअरमन सिताराम पा. गायकर, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमित भांगरे, मधुकरराव नवले, सर्व संचालक, विजयराव वाकचौरे, सुरेश नवले, शांताराम संगारे, तुकाराम गोर्डे, योगेश नाईकवाडी, राजेंद्र गवांदे, कार्यकारी संचालक अजित देशमुख, केन मॅनेजर सयाजी पोखरकर, विश्वास ढगे, सतीश देशमुख, रमेश पुंडे, उल्हास देशमुख, कोंडीबा पवार, श्री. सहाणे आदीसह भांगरे समर्थक उपस्थित होते.

यावेळी अमित भांगरे म्हणाले की, आपल्या सर्वांचे नेते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अगस्ती सहकारी साखर कारखाण्याचे सर्व ज्येष्ठ संचालक, नेते यांनी बैठक घेऊन सुनिताताई भांगरे यांची बिनविरोध निवड करण्याचा निर्णय घेतला, याबद्दल सर्वांचे आभार मानतो. सूनिताताई यांना विनंती करतो की, राजकारण हे समाजकारणातून केले जाते मात्र सहकार क्षेत्रातील हे पद काटेरी मुकुट आहे.

अगस्ती कारखाना आर्थिक अडचणीत आहे. आदिवासी भागात ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही तीनही संचालक अगस्तीला मदत करण्यासाठी प्रयत्न करू. अगस्ती कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. सुनिताताई भांगरे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सुनीताताई भांगरे यांची व्हा. चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply