Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

उमेदवारीसाठी अर्थकारण हाच कळीचा मुद्दा

बाजार समितीत सोसायटीसाठी ‘वीस’ तर ग्रामपंचायतसाठी ‘तीस’ची दक्षिणा दिली तरच उमेदवारी

विजय उंडे । वीरभूमी- Apr 09, 2023 • 12:35 AM 941 views

श्रीगोंदा ः श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही पॅनलकडून प्रबळ उमेदवारांचे दावे केले जात आहेत. दोन्ही पॅनलचे नेते आर्थिक गडगंज उमेदवारांच्या शोधात असून उमेदवारी मिळवतांना दोन नंबरवाल्यांची या निवडणुकीत चांदी होणार आहे. दोन्ही पॅनलकडून दोन नंबरवालेच जास्त उमेदवार झाल्यास नवल वाटायला नको.

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात चालली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आ. बबनराव पाचपुते व राजेंद्र नागवडे यांनी एकत्रित पॅनल करण्याची घोषणा केली असून त्यांच्या विरोधात माजी आमदार राहुल जगताप यांचे स्वतंत्र पॅनल उभे राहणार आहे.

माजी आमदार राहुल जगताप यांची निवडणुकीतील सूत्रे राज्य बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार सांभाळत आहेत. पाचपुते व नागवडे गटाची सूत्रे दत्तात्रय पानसरे, आदेश नागवडे, वैभव पाचपुते व लक्ष्मण नलगे या चौघांच्या हाती असून अर्थकारणाची सर्व गणिते या नेत्यांभोवती फिरणार आहेत.

आ. बबनराव पाचपुते व राजेंद्र नागवडे या दोन्ही नेत्यात युती झाल्यानंतर उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून प्रत्येकी 9 जागेवर त्यांच्या समर्थकांना उमेदवार्‍या दिल्या जाणार असल्याचे समजते. नागवडे गटाला सोसायटीच्या 4 जागा, भटक्या विमुक्त जाती-जमाती साठी 1, ग्रामपंचायतसाठी 2 जागा (1 सर्वसाधारण व 1 दुर्बल घटक), आडते-व्यापारी 1 जागा व महिला प्रतिनिधी 1 जागा अशा 9 जागा नागवडे गटाला

तर आ. बबनराव पाचपुते गटाला सोसायटीच्या 3 जागा, ग्रामपंचायतमध्ये 2 जागा (सर्वसाधारण 1 व अनुसूचित जाती 1), महिला प्रतिनिधी 1 जागा, इतर मागासवर्गीय प्रवर्ग 1 जागा, हमाल मापाडी प्रतिनिधी 1 जागा, आडते - व्यापारी 1 जागा अशा 9 जागांवर उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे समजते.

माजी आमदार राहुल जगताप यांच्यावर एकाकी भार पडल्याने त्यांनी त्यांच्या साथीला स्व. सदाशिव पाचपुते यांचे चिरंजीव साजन पाचपुते यांना घेतले आहे. बाळासाहेब नहाटा व अण्णासाहेब शेलार या जोडीच्या खांद्यावर सर्व जबाबदारी आहे. सहकार महर्षी नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विरोधी पॅनलचे प्रमुख केशवराव मगर यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात असून ते काय भूमिका घेतात यावर या निवडणुकीचे चित्र बरेचसे अवलंबून राहणार आहे.

सोसायटीला ‘वीस’ तर ग्रामपंचायतला ‘तीस’ घेऊन या.. प्रमुखांचा इच्छुकांना फतवा!!

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक अंतिम टप्प्याकडे जात असतानाच उमेदवारीचे निकष ठरविले जात आहेत. सोसायटी मतदारसंघातून इच्छुकांसाठी ‘वीस’चे टार्गेट ठेवले जात आहे. या निवडणुकीत सर्वाधिक हाय व्होल्टेज मतदारसंघ ग्रामपंचायत राहणार आहे. ग्रामपंचायत मतदारसंघात केवळ दोनच जागा सर्वसाधारण असल्याने या जागेवर माजी आमदार राहुल जगताप गटाकडून साजन पाचपुते व मितेश नहाटा यांची उमेदवारी निश्चित केल्याचे समजते. त्यांच्या विरोधात आ. पाचपुते व नागवडे गटाकडून दत्तात्रय पानसरे व आदेश नागवडे यांना आखाड्यात उतरविण्याची रणनीती आखली जात आहे. या मतदारसंघात सर्वाधिक ‘महापूर’ येण्याची शक्यता आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply