Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

जनतेची अविरत सेवा करत असल्यानेच पुरस्कार मिळाला

हर्षदाताई काकडे । लखमापुरी महालक्ष्मी मंदिरात महाआरती

 शेवगाव । वीरभूमी - Apr 09, 2023 • 01:36 PM 809 views

सामाजिक कार्य करत असताना कुठलाही राजकीय हेतू मनामध्ये न ठेवता आपण जनतेची सेवा करत आहोत. जनतेची अविरत निःस्वार्थ सेवा करत आहे म्हणूनच हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे मला मिळालेला पुरस्कार मी आई महालक्ष्मी देवीच्या व जनतेच्या चरणी अर्पण करते, असे प्रतिपादन मा. जि. प. सदस्या हर्षदाताई काकडे यांनी केले.

शेवगाव तालुक्यातील लखमापुरी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात मासिक उत्सवानिमित्त चैत्र पौर्णिमेनिमित्त महाआरतीचे आयोजन व जि. प. सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांना  राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना सौ. काकडे बोलत होत्या.

सौ. काकडे म्हणाल्या की, श्री महालक्ष्मी देवस्थानाला तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करण्याबद्दल प्रयत्न करून या देवस्थानाचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा निर्धार असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व शासन दरबारी प्रश्न मांडून सतत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. 

यावेळी देवस्थानचे सचिव अशोक ढाकणे म्हणाले की, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड या संस्थानातील सरदार शहाजीराव नाईक यांनी निर्माण केलेल्या पूर्वाश्रमीच्या लक्ष्मीपुरी व सध्याच्या लखमापूरी या गावांमध्ये उपलब्ध इतिहासानुसार 500 वर्षापासून प्रतिदिन नित्य श्री. महालक्ष्मी मंदिरामध्ये पूजा होते. गावामध्ये गेल्या वर्षापासून प्रति पौर्णिमेला महाआरती व महाप्रसादाची पंगत लोकसहभागातुन करण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी देवस्थानचे अध्यक्ष भाऊसाहेब अंबाडे, जनशक्ती युवा विकास आघाडीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण पातकळ, वि.का.से.सो.चेअरमन बापूराव गाडे, व्हा.चेअरमन माणिकराव शेळके. ग्रा.पं.सदस्य संदीप हिंगे, शरद जोशी, सुधाकर सांगळे, रामेश्वर अंबाडे, सुभाष गावंडे, बाळासाहेब कवडे, राम वाबळे, भरत सरोदे, दीपक सोनवणे, विजय मातंग, दत्तात्रय जराड, राजेंद्र मंचरे, कृष्णा सरोदे, कृष्णा निर्मळ, विष्णू जराड, रामेश्वर निर्मळ, विष्णू डोंगरे, काकासाहेब अंबाडे, छाया जर्‍हाड, हिराबाई पवार, संगीता मंचरे, प्रियांका निर्मळ, नंदा सोनवणे, निर्मला ढाकणे, सरला निर्मळ, सुवर्णा अंबाडे, वनिता गावंडे, वैशाली पवार, सरस्वती हिंगे यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply