Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

वेगवान पाठपुरावा करुन नुकसानग्रस्तांना मदत करावी

स्वाभिमानीचे दत्तात्रय फुंदे यांची मागणी । मागील नुकसानीची अद्यापही भरपाई न मिळाल्याची खंत

 शेवगाव । वीरभूमी - Apr 11, 2023 • 10:06 AM 715 views

शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, देवटाकळी, भातकुडगाव परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर दुसर्‍याच दिवशी सकाळी आजी-माजी आमदारांनी शेतकर्‍यांच्या बांधावर हजेरी लावत पहाणी केली.

मात्र मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीचे व  महापूर नुकसानीची भरपाईच अजुन मिळाली नाही. आजी-माजी आमदारांनी नुकसान पहाणीचा फार्स करण्यापेक्षा तातडीने नुकसान भरपाई मिळण्यासाठी सरकार दरबारी वेगवान पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा स्वाभिमानीचे दत्तात्रय फुंदे यांनी व्यक्त केली.

शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, देवटाकळी, भातकुडगाव, एरंडगाव, ढोरजळगाव परिसरातील सुमारे 14 गावांतील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार 3 हजार 673 शेतकर्‍यांचे 2 हजार 197 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या व पिल्ले दगावले. काही ठिकाणचे राहत्या घराचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. झाडे उन्मळून पडले आहेत. 

या अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येणार आहे. मात्र सत्ताधारी व विरोधक फक्त नुकसानग्रस्त भागाच्या पहाणीचा फार्स करत आहेत. अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळीच आजी - माजी आमदारांनी स्वतंत्रपणे शेतकर्‍यांच्या बांधावर व शेतात जावून पहाणी करत फोटो सेशन केले. मात्र या शेतकर्‍यांना मदत कधी मिळणार, असा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

यामुळे पहाणी दौरा तातडीने आणि पैसे बारा महिण्यांनी असे म्हणण्याची वेळ शेतकर्‍यांवर येत आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीचे पैसे अजूनही शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत.

त्याचपमाणे वरुर, भगूर, आखेगाव, खरडगाव, जोहरापूर या नदी काठच्या गावांत महापूर येवून जनावरे वाहून गेली होती. घरांचे अतोनात नुकसान झाले. नदीकाठची शेतीपिके वाहुन गेली. या घटनेने शेतकरी उद्धवस्त झाला. मात्र गेल्या दीड-दोन वर्षापासून अद्यापर्यंत या नुकसानीची भरपाई शेतकर्‍यांना मिळालेली नाही. याचा विचारही आजी-माजी आमदारांनी करावा. फक्त नुकसानग्रस्त भागांची पहाणी करुन काही होत नाही.

संबधित तलाठ्यांना शेतकर्‍याच्या बांधावर जावून वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि नुकसानीची तातडीने मदत मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावेत. मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचे नुकसान निरंक दाखवण्यात आलेले आहे. मात्र शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसलेला आहे. अशा शेतकर्‍यांनाही मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी मागणी दत्तात्रय फुंदे यांनी केली आहे.

एकीकडे सरकार व त्यांचे मंत्री कायम सांगतात हे सरकार सर्वसामान्यांचे, शेतकर्‍यांचे सरकार आहे. मात्र फक्य घोषणा होतात, मात्र अडचणीतील शेतकर्‍यांना मदत मिळत नाही. यामुळे नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीचा फार्स करण्यापेक्षा नुकसान भरपाई मिळण्यासाठी सरकार दरबारी वेगवान जाहिरातीपेक्षा वेगवान पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा स्वाभिमानीचे दत्तात्रय फुंदे यांनी व्यक्त केली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply