Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; शेवगावच्या आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी

अतिरीक्त व पोक्सो न्यायालयाचा निकाल ।  शिक्षेबरोबरच 10 हजाराच्या दंडाची शिक्षाही

अहमनगर । वीरभूमी - May 09, 2023 • 10:36 AM 3746 views

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी निलेश राजु झेंडे (वय 22, रा. गेवराई रोड, शेवगाव) याला अहमदनगर येथील अतिरिक्त व विशेष (पोक्सो कोर्ट) जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी 20 वर्षे सक्त मजुरी व 10 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 1 वर्षे साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मनिषा पी. केळगंद्रे- शिंदे यांनी पाहिले.

घटनेची थोडक्यात हकीगत की, फिर्यादी यांची अल्पवयीन पिडीत मुलगी ही दहावी वर्गात शिक्षण घेत होती. दि.4/4/2022 रोजी पिडीतेचा दहावीचा शेवटचा पेपर होता. फिर्यादी हे संध्याकाळी जेवन करून झोपलेले असताना, त्यांची पिडीत मुलगी ही रात्री ज्या ठिकाणी झोपली होती. त्या ठिकाणी ती मिळून आली नाही म्हणून त्यांनी तिचा घरात व आजुबाजूला शोध घेतला. परंतु ती त्यांना मिळून आली नसल्याने त्यांनी शेवगाव पोलिस स्टेशन येथे अज्ञात व्यक्ती विरूध्द फिर्याद दिली.

त्यानुसार शेवगाव पोलिस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.  सदर गुन्हयाचा सुरूवातीस तपास पो.हे.कॉ. वीर यांनी केला. शेवगाव पोलिसांनी पिडीत मुलीचा तपास केला असता आरोपी हा पिडीत मुलीला घेवून गणपती माथा, वारजे येथे राहत असलेल्या ठिकाणाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस व पिडीतेचे वडील हे घटनास्थळी पोहचले. तेथे शेवगाव पोलिसांनी वारजे पोलिसांच्या मदतीने पिडीत मुलगी व आरोपी यांना ताब्यात घेतले.

त्यानंतर पिडीत मुलगी यांना घेवून शेवगाव पोलिस स्टेशन येथे आले. पोलिस स्टेशनला आल्यानंतर पिडीत मुलीने पोलिसांसमोर घटनेची माहिती सांगून जबाब दिला की, आरोपी निलेश राजु झेंडे पिडीतेस म्हणाला की, तुझे पेपर संपले आहेत. आपण आता पळून जावून लग्न करू. त्यानंतर दि. 5/4/2022 रोजी आरोपी हा पिडीत मुलीस पळून पुणे येथे घेवून गेला. तिथे एका रूमवर तिच्या गळ्यात हार घालून घरातच लग्न केले. त्यानंतर 22 दिवसांनी पिडीतेला घेवून तो गणपती माथा, वारजे येथे राहावयाय घेवून गेला.

दोन्ही ठिकाणी राहत असताना, आरोपीने पिडीत मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील तिचेशी बळजबरीने शारिरीक संबंध केले. पोलिस पिडीतेचा जबाब झाल्यानंतर सदर गुन्हयास वाढीव कलम लागल्याने पुढील तपास सहा. निरीक्षक आशिष प. शेळके यांनी करून मा. न्यायालयात दोषारोपपत्र मुदतीत दाखल केले. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले.

यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी, पिडीत मुलीचे वडील, पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी, वयासंदर्भात नगर परिषद शेवगावचे माहितगार इसम व मुख्याध्यापक यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. तसेच आलेला पुरावा व युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस मा. न्यायालयाने वरील प्रमाणे शिक्षा ठोठावली.

सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले. त्यांना पो.कॉ. विजय गावडे व पैरवी अधिकारी आर. व्ही. बोर्डे यांनी सहकार्य केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply