Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

डॉ. सादिक राजे यांची स्विकृत नगरसेवकपदी निवड

नगरपंचायतींच्या विषय समित्यांवर शेलार, मते, औटी व शेख यांची वर्णी

पारनेर । वीरभूमी - May 11, 2023 • 04:58 PM 1123 views

पारनेर नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सादिक बाल राजे यांची एकमताने स्विकृत नगरसेवकपदी निवड करण्यात झाली. तर बांधकाम समितीच्या सभापतीपदी भूषण शेलार, पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी योगेश मते, स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी नीता विजय औटी तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी जायदा राजू शेख यांची एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी 17 पैकी 14 नगरसेवक हजर होते तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे तीन बंडखोर नगरसेवक गैरहजर होते. भाजपाचे एकमेव नगरसेवक अशोक चेडे हे महाविकास आघाडीच्या बरोबरच आहेत.

स्वीकृत नगरसेवक श्रीकांत चौरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर उपविभागीय अधिकारी बालाजी क्षीरसागर व पारनेर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. सुनिता कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत डॉ. सादिक राजे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड करण्यात आली.

आ. निलेश लंके यांचे कट्टर समर्थक व राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सादिक राजे यांनी सकाळी 11 वाजता नगराध्यक्ष विजय औटी, नगरसेवक योगेश मते, भूषण शेलार, अशोक चेडे, नितीन अडसूळ, डॉ. विद्या कावरे, जायदा शेख, हिमानी नगरे, सुभाष शिंदे, डॉ बाळासाहेब कावरे, माजी नगरसेवक मुदस्सीर सय्यद, बाळासाहेब नगरे आदींच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करायच्या वेळेत डॉ. सादिक राजे यांचा एकमेव अर्ज आल्याने उपविभागीय अधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी डॉ. सादिक राजे यांची एकमताने निवड जाहीर केली.  यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके व गुलालाची उधळण करत जल्लोष केला. 

यावेळी उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर, नगरसेविका प्रियंका सचिन औटी, शुभम देशमुख, नवनाथ सोबले, कांतीलाल ठाणगे, डॉ. सचिन औटी, विजय भास्कर औटी, राजू शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बंडु गायकवाड, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष रमिज राजे, विजय डोळ, अमित जाधव, अकील शेख, उमेश औटी, अमजद शेख, सलीम राजे, फिरोज राजे, वसीम राजे, बबलू राजे, अमन राजे, फहाद राजे, सुलतान शेख, विठ्ठल म्हस्के, मुख्याध्यापक संतोष ठाणगे, पप्पू कावरे, मौलाना अबुल, अहेमदअली मोमीन, मुदस्सर राजे आदींनी अभिनंदन केले. 

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply