Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

केदारेश्वर, गणेश कारखान्याचा बिगुल वाजला

गणेशसाठी 17 जून तर केदारेश्वरसाठी 18 जुन रोजी मतदान

अहमदनगर । वीरभूमी - May 14, 2023 • 12:43 PM 2848 views

राहाता तालुक्यातील गणेश अहकारी साखर कारखाना व शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीला बिगुल वाजला आहे. गणेशसाठी 17 जून तर केदारेश्वरसाठी 18 जून रोजी मतदान होत आहे. दोन्ही कारखान्यासाठी 15 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे.

गणेश कारखाना भाजपाचे खा. डॉ. सुजय विखे यांच्या तर केदारेश्वर कारखाना राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्या ताब्यात आहे. दोन्ही कारखान्याचा निवडणुकीला बिगुल वाजल्याने सहकाराच्या राजकारणात हालचालींना वेग वाढला आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने गणेश व संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या सोमवार दि. 15 मे पासून प्रारंभ होत आहे. ही मुदत 19 मे पर्यंत आहे. त्यानंतर दाखल अर्जाची छाननी 22 मे रोजी होणार आहे. दि. 6 जून पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी तर दि. 7 मे रोजी निवडणुकीच्या रिंगणात राहणार्‍या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. तर आवश्यक असल्यास गणेशसाठी 17 जून रोजी तर संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर कारखान्यासाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 19 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

दोन्ही कारखान्यासाठी प्रत्येकी 19 जागा निवडून द्यावयाच्या आहेत. गणेश कारखान्यासाठी सर्वसाधरण जागेसाठी शिर्डी 2, राहाता 3, अस्तगाव 3, वाकडी 3, पुणतांबा 2 अशा 13 जागा निवडून द्यावयाच्या आहेत. तर उत्पादक सहकारी सनस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी 1, अनु. जाती/अनु. जमाती प्रतिनिधी 1 जागा, महिला प्रतिनिधी 2, इतर मागास प्रवर्ग 1, भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रतिनिधी 1 अशा 19 जागा निवडून द्यावयाच्या आहेत.

तर संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर करखान्यासाठी सर्वसाधरण जागेसाठी बोधेगाव 2, हातगाव 3, मुंगी 3, चापडगाव 3, हसनापूर 2 अशा 13 जागा निवडून द्यावयाच्या आहेत. तर उत्पादक सहकारी सनस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी 1, अनु. जाती/अनु. जमाती प्रतिनिधी 1 जागा, महिला प्रतिनिधी 2, इतर मागास प्रवर्ग 1, भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रतिनिधी 1 अशा 19 जागा निवडून द्यावयाच्या आहेत.

दोन्ही कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. गणेश कारखाना भाजपा खा. सुजय विखे यांच्या तर केदारेश्वर कारखाना राष्ट्रवादीचे अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्या ताब्यात आहे. 

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply