Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षपदी योगिता राजळे यांची निवड

राष्ट्रवादी वर्धापन दिन कार्यक्रमापूर्वी महिला जिल्हाध्यक्षांची नियुक्ती

पाथर्डी । वीरभूमी- Jun 03, 2023 • 12:27 AM 1112 views

राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला अहमदनगर जिल्हाध्यक्षपद अनेक दिवसांपासून रिक्त होते. या पदावर  जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या योगिता शिवशंकर राजळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी आज प्रसिद्ध केले.

या नियुक्तीपत्रात पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे विचार व पक्षाचे ध्येय धोरण चांगल्या पद्धतीने राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. योगिता राजळे या पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या महिला नेत्या समजल्या जातात.

जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष मंजुषा गुंड या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष होत्या. त्यांनी वैयक्तिक कारणास्तव मागील वर्षी पदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त होते. या पदासाठी अनेक नावे समोर आली होती. मात्र राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी राजळे यांच्या नावाला सहमती दर्शविल्याचे समजते.

यानिमित्ताने पक्ष संघटनेतील महत्त्वाचे पद पाथर्डी तालुक्याला मिळाले असल्याने पाथर्डी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे चैतन्याचे वातावरण आहे. राजळे यांना जिल्हा परिषदेतील कार्यकाळाचा मोठा प्रशासकीय अनुभव असल्याने राजळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महिला आघाडी व पक्ष संघटन आणखी मजबूत होईल, अशी आशा पक्षाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन कार्यक्रमा पूर्वी महिला जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply