Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

पाथर्डी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात 25 वा वर्धापनदिन साजरा

पाथर्डी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात 25 वा वर्धापनदिन साजरा

 पाथर्डी । वीरभूमी - Jun 12, 2023 • 01:47 PM 913 views

धर्मनिरपेक्ष विचारधारेचा वारसा जोपासून राज्यात सर्वधर्मसमभाव ही संकल्पना प्रत्यक्षात आणत महाराष्ट्र आज प्रगतिपथावर नेत सर्वांचे उज्ज्वल भवितव्य घडविणारे नेते शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून राष्ट्रवादीच उद्याचा महाराष्ट्र घडवु शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणिस अ‍ॅड. प्रतापराव ढाकणे यांनी केले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त आज पाथर्डीत सकाळी पक्ष कार्यालय येथे झेंडावंदन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच स्व. वसंतराव नाईक पुतळ्यास अभिवादन त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज वंदन करून क्रिकेट स्पर्धा शुभारंभ असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. 

यावेळी तालुकाध्यक्ष शिंवशंकर राजळे, बंडु पा. बोरूडे, महारूद्र किर्तने, गहिनीनाथ शिरसाट, डॉ.राजेंद्र खेडकर, ज्ञानदेव केळगंद्रे, योगेश रासने, बन्सी आठरे, राजेंद्र बोरूडे, सविता भापकर, रत्नमाला उदमले, ज्योती जेधे, वैभव दहिफळे, देवा पवार, आजिनाथ खेडकर, ज्ञानदेव खेडकर, सिताराम बोरूडे आदी उपस्थित होते.

अ‍ॅड. ढाकणे म्हणाले, स्वाभिमानी विचारातून जनसामान्यांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवार यांनी 25 वर्षापुर्वी केली. त्यापुर्वी पवारांनी पुरोगामी विचारसरणी अमलात आणत राज्यातील प्रत्येक घटकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आजपर्यंत काम केले. यशवंतराव चव्हाण साहेब यांचा वसा जोपासून पवार साहेब यांनी समाजकारणात आपले योगदान देत आहेत.

आज जातीय राजकारण व इतर अनावश्यक बाबींनी धुमाकुळ घातला आहे. तो लोकशाहीला घातक असुन त्यास रोखण्यासाठी सर्वसमावेशक विचारधारा जोपसेने गरजेची असून त्यासाठी जनतेने शरद पवारांना व त्यांच्या विचारसरणीला साथ द्यावी असे आवाहन ढाकणे यांनी केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply