Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

दूध उत्पादक शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील । शासन आपल्या दारी उपक्रमात ग्रामस्थांशी संवाद

 शिर्डी । वीरभूमी - Jun 12, 2023 • 01:39 PM 607 views

लम्पी आजारात राज्यातील सर्व पशुधनाचे मोफत लसीकरण करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. दूध दरामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी सहकारी आणि खासगी दूध संघाची एकत्रिपणे बैठक घेण्यात येईल कोणत्याही परिस्थितीत दूध उत्पादक शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. अशी ग्वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली.

शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी आज कनकुरी, नादुर्खी खुर्द आणि बुद्रूक या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासन योजनांची माहिती देवून नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

महसूलमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकार गंभीर असून, दूध उत्पादक शेतकर्‍यांवर कोणताही अन्याय होणार नाही. राज्यात लम्पी संकट मोठ्या प्रमाणात आले असताना जनावरांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला. ज्यांची जनावरे दगावली त्यांनाही आर्थिक मदत राज्य सरकारने केली असल्याचे महसूलमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

राज्यात जनतेच्या मनातील सरकार असल्याने सर्वच समाजातील घटकांच्या हिताचे निर्णय होत आहेत. शासन आपल्या दारी या उपक्रमातून शासनाच्या निर्णयांचा लाभ सामान्य माणसाला होत आहे की नाही याचाही आढावा घेतला जात असून, गावातील समस्या सुटण्यासाठीही हा उपक्रम महत्वपूर्ण ठरला असल्याचे त्यांनी सांगितले.

शिर्डी आणि परिसरातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हाच आपला प्रयत्न असून, येत्या काळात शेती महामंडळाच्या जमीनींचा विनीयोग औद्योगिक कंपन्या उभारण्यासाठी करण्यात येणार असून, याबाबतचे नियोजन आता सुरु झाले असल्याचे महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply