Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

दोन पाकीटमारांना श्रीगोंदा पोलिसांकडून अटक

दोन पाकीटमारांना श्रीगोंदा पोलिसांकडून अटक

 श्रीगोंदा । वीरभूमी - Jun 13, 2023 • 01:07 PM 946 views

श्रीगोंदा बसस्थानकावर प्रवाशांचे पाकीट व गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने लांबणार्‍या दोन भुरट्या चोरांना श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 28 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, 2 जून रोजी श्रीमती विजया जालिंदर कदम (वय 59 वर्षे) रा. भैरवनाथ गल्ली, श्रीगोंदा यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, दि. 28 मे रोजी स्वारगेट ते जामखेड जाणार्‍या बसने श्रीगोंदा येथुन वालवड ता. कर्जत येथे जात असताना श्रीगोंदा बस स्थानकावर अज्ञात चोरट्याने पिशवीतील सोन्याचे गंठण चोरले.

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दि. 9 जुन रोजी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांना माहिती मिळाली की हा गुन्हा श्रीगोंदा येथील अनिल रामदास अढागळे (रा. ससाणेनगर) याने केला आहे. निरीक्षक भोसले यांनी पोलीस पथक पाठवून आरोपी अढागळे यास अटक केली असता त्याने हा गुन्हा कबूल करून राजेंद्र उर्फ भारत रामु माने (रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) याची गुन्ह्यात मदत घेतली असल्याचे सांगितले. पोलिसांनी माने यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरलेले 28 गॅम वजनाचे सोन्याचे दागीने जप्त करण्यात आले आहेत.

दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी यापूर्वी केलेले आणखी दोन गुन्हे उजेडात आले आहेत. दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार गोकुळ इंगवले करत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, सपोनि. समिर अभंग, सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार अंकुश ढवळे, गोकुळ इंगवले, अमोल कोतकर, प्रताप देवकाते, गणेश साने, रविंद्र जाधव, नितीन शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply