Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

ग्रामीण भागातील तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे

हर्षदाताई काकडे । भायगाव येथे तलाठी कार्यालयाचे उद्घाटन व गुणवंत, बाजार समितीच्या नूतन संचालकांचा सन्मान

 शेवगाव । वीरभूमी - Jun 13, 2023 • 01:13 PM 903 views

पारंपारिक शेती उद्योगाला जोड  म्हणून छोटे-मोठे जोडधंदे उभे करा, त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राची मदत घ्या त्यासाठी लागणार्‍या प्रत्येक गोष्टीची पूर्तता करण्यासाठी काकडे कुटुंबीयांकडून सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली जाईल. ग्रामीण तरुणांनी उद्योग व्यवसाय व उच्च शिक्षणासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळही दिले जाईल. शेतकरी व तरुणांनी उद्योग व्यवसायासाठी भरारी घेतली पाहिजे असे मत जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे यांनी मांडले.

शेवगाव - नेवासा राज्य मार्गावरील भायगाव येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या शासन धोरणानुसार भायगाव व मजलेशहरसाठी स्वतंत्र भायगाव सजा या तलाठी कार्यालयाच्या उद्घाटन, दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन संचालकांचा सत्कार समारंभ प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे बोलत होत्या.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन ज्येष्ठ नेते दिलीपराव लांडे, आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे पृथ्वीसिंह काकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल बेडके, भायगावचे सरपंच सौ. मनीषाताई आढाव, उपस्थित होते. ग्रामीण भागातील छोटे मोठे उद्योग व्यवसाय करू इच्छिणार्‍या शेतकरी, तरुण व तरुणीसाठी लवकरच जिल्हा उद्योग केंद्र मार्फत भायगाव मध्ये शिबिर घेण्यात येणार आहे.त्यामध्ये उद्योग व्यवसाय व त्यासाठी लागणार्‍या आर्थिक बाजूसाठी संपूर्ण माहिती उपलब्ध करून देणार असल्याचेही यावेळी सौ. काकडे यांनी जाहीर केले.

यावेळी युवा नेते राजेंद्र आढाव, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन कल्याण आढाव, भगवान आढाव, गणपत आढाव, जनार्दन लांडे, हरिचंद्र आढाव, सदाशिव शेकडे, पंढरीनाथ सांगळे, डॉ. रामराव आढाव, विष्णू महाराज दुकळे, डॉ.परवेज सय्यद, भायगावच्या उपसरपंच आशाताई लांडे, माजी सरपंच रामनाथ आढाव, डॉ.विजय खेडकर, रावसाहेब आढाव, भातकुडगावचे मंडलाधिकारी आप्पासाहेब शिंदे, कामगार तलाठी प्रदीप मगर, मुक्तार शेख, शिवाजी लांडे, मच्छिंद्र आढाव, रामदास शेकडे, अविनाश देशपांडे, कानिफनाथ घाडगे, रामेश्वर उमेदळ, सुभाष सौदागर, ग्रामविकास अधिकारी एस. जे. शेख, आप्पासाहेब सौदागर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र आढाव यांनी केले. सूत्रसंचालन शहाराम आगळे यांनी केले तर हरिभाऊ अकोलकर यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply