Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

वारकर्‍यांवरील लाठीमाराचा संगमनेर शिवसेना वारकरी भजनी मंडळाकडून निषेध

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी

 संगमनेर । वीरभूमी - Jun 14, 2023 • 12:53 PM 834 views

आळंदी येथे रविवारी वारकर्‍यांवर झालेली लाठीचार्जची घटना निंदनीय आहे. या घटनेची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा व संबंधित पोलिस अधिकार्‍यांचे निलंबन करावे, अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी यांनी केली. संगमनेर बसस्थानकासमोर सोमवारी संगमनेर शिवसेना वारकरी भजनी मंडळाने घटनेचा निषेध करत आंदोलन केले.

शहर शिवसेनेने वारकर्‍यांसोबत दिंडी काढून भजन, कीर्तन करत शिंदे-फडणवीस सरकार विरोधात घोषणाबाजी केली. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संस्कृतीला या घटनेने गालबोट लागले. फडणवीस मुख्यमंत्री असताना वारकरी व वारीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. आत्ता लाठीचार्जचे पुरावे असताना गृहमंत्री फडणवीस यांनी ही न घडलेली घटना आहे, असे सांगितले आहे.

त्यांना असे बोलताना काही वाटत नाही का? असा संतप्त सवाल कतारी यांनी उपस्थित केला. घटनाबाह्य सरकारने वारकरी संप्रदायाची माफी मागावी, अशी मागणी तालुका प्रमुख भाऊसाहेब हासे, संजय फड, संपर्कप्रमुख नरेश माळवे, महिला आघाडीच्या शितल हासे, संदीप रहाणे, युवासेनेचे गोविंद नागरे यांनी यावेळी केली. उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, वेणुगोपाल लाहोटी, संघटक दीपक साळुंके, अजीज मोमीन, विजय भागवत, वैभव अभंग, अमोल डुकरे, जना नागरे, मार्केट कमिटीचे सदस्य विजय सातपुते, अक्षय गाडे, महिला आघाडीच्या संगीता गायकवाड, आशा केदारी, योगेश बिचकर, सुदर्शन इटप, रवी गिरी, संतोष कुटे आदींसह पदाधिकारी व वारकरी यावेळी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply