Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

अहमदनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा

अहमदनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा

 नगर । वीरभूमी - Jun 14, 2023 • 01:08 PM 916 views

अक्षय भालेराव हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, भालेराव यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करून एका व्यक्तीला शासकीय नोकरीत घ्यावे तसेच कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे. अकार्यक्षम ठरलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा, आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील सकल बौद्ध व आंबेडकरी समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, किरण दाभाडे, सोमा शिंदे, संजय कांबळे, बंटी भिंगारदिवे, योगेश साठे, नाथा अल्हाट, नगरसेवक राहुल कांबळे, बंडू आव्हाड, विवेक भिंगारदिवे, सागर ठोकळ, प्रा. जयंत गायकवाड, नितीन कसबेकर आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.

निवेदनात म्हटले की, नांदेड येथील बोंडार गावातील अक्षय भालेराव यांची हत्या करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पहिल्यांदा गावात साजरी केल्याचा राग मनात धरून गावातील समाजकंटकांनी संगनमताने अमानुषपणे ही हत्या केली तसेच कुटुंबियाला देखील मारहाण केली. डॉ आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून मारेकर्‍यांना एवढा द्वेष का? जातीय व धार्मिक द्वेष पसरून शांतता भंग करण्याचा जातीयवादी शक्तींकडून प्रयत्न होत आहे. त्यामुळे देशात व राज्यात अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांचे सरकार अस्थिर असल्यामुळे सरकारचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही. त्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. महागाई, बेरोजगारीमुळे तरुणांच्या हाताला काम नसून रोजगार मागू नये म्हणून जातीयतेचे व धार्मिकतेचे राजकारण वेगाने सुरू झाले आहे. 16 ते 23 वर्षे वयोगटातील निरागस मुले धर्माच्या अफुला बळी पडून दंगलीत पुढाकार घेऊन दगडफेक करतात. पोलिसांच्या कारवाईत हे तरुण सापडतात. त्यामुळे सामान्य जनतेच्या मनात केंद्र सरकार विषयी उद्रेक निर्माण झालेला आहे. जातीय, धार्मिक भडकावू भाषणे करणार्‍या व्यक्तींवर कारवाई करावी. देशातील महागाई कमी करून घोषणा केल्याप्रमाणे दोन कोटी नोकर्‍या देण्यात याव्यात. अकार्यक्षम ठरलेल्या शिंदे- फडणवीस सरकारने तत्काळ राजीनामा देण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे. 

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply