Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

शेवगावात दरोडेखोरांच्या मारहाणीत दोघांचा मृत्यू

एक जखमी । शेवगाव शहरासह तालुक्यात खळबळ

शेवगाव । वीरभूमी - Jun 23, 2023 • 09:10 AM 6385 views

शेवगाव शहरातील  भुसार मालाचे व्यापारी गोपीकिशन गंगाकिशन बलदवा यांच्या भरबाजारपेठेमधील घरावर दरोडा पडला आहे. हा दरोडा शुक्रवार दि. 23 रोजी पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यान पडला आहे.

यामध्ये दरोडेखोरांच्या मारहाणीमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने शेवगाव शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

गोपीकिशन गंगाकिशन बलदवा (वय 55) व त्यांच्या भावजयी पुष्पा हरिकिशन बलदवा (वय 65) अशी मयताची नावे असून सुनीता गोपीकिशन बलदवा या जखमी झाल्या आहेत. शेवगाव येथील भुसार मालाचे व्यापारी गोपीकिशन गंगाकिशन बलदवा यांचे बाजारपेठेत घर आहे. शुक्रवारी पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरावर दरोडा पडला. दरोडेखोरांच्या मारहाणीत गोपीकिशन बलदवा व त्यांची भावजयी पुष्पा बलदवा यांचा मृत्यू झाला आहे.

दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी सळईने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर सुनीता बलदवा या जखमी झाल्या आहेत.

घटनेची माहिती कळताच अपर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागिय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली.

दरोडेखोरांच्या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने शेवगाव शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. या घटनेने व्यापार्‍यामधून संताप व्यक्त होत आहे. 

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply