Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शेवगाव येथील बलदवांचा मारेकरी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश

शेवगाव । वीरभूमी - Jun 25, 2023 • 10:41 AM 11344 views

शेवगाव शहरातील आडत व्यापारी गोपीकिशन बलदवा व त्यांच्या भावजयी पुष्पा बलदवा यांची हत्या करणारा आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. बदलवा यांचा मारेकरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बीडकिन येथून जेरबंद केला असून या हत्याप्रकरणात अजुन कोणाचा सहभाग आहे का? याची पोलिस पडताळणी करत आहेत.

शुक्रवारी पहाटे 4 ते 5 वाजेच्या दरम्यान शेवगाव शहरातील आडत व्यापारी गोपीकिशन बलदवा व त्यांच्या भावजयी पुष्पा बलदवा यांचा खून करुन तब्बल 4 लाख 95 हजार रुपये किंमतीचा ऐवज घेवून पसार झालेला मारेकरी बीडकिन (ता. पैठण) येथून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

बलदवा यांच्या हत्येनंतर पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी दोन पथके तयार करुन आरोपीच्या शोधासाठी रवाना केले होते. यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 36 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र या प्रकरणात एकच आरोपी आहे की आणखी आरोपींचा सहभाग आहे याबाबत पोलिस पडताळणी करत आहेत.

पकडण्यात आरोपी हा बीडकिन (ता. पैठण) येथील असून त्याने या अगोदर अशाच प्रकारे हत्या करुन चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे. तो चारचाकी छोटा हत्ती वाहनातून येवून चोरी व हत्या असे प्रकार करत असल्याचा पोलिसांना संयश आहे.

बलदवा यांच्या हत्येच्या घटनेनंतर सर्वस्तरातून घटनेचा निषेध करण्यात येत आहे. शेवगाव शहरातील व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळून घटनेचा निषेध केला होता. तर माहेश्वरी समाज, व्यापारी, सर्वपक्षिय नेते व ग्रामस्थ यांनी तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढून आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply