Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

शेवगाव येथील बलदवा यांची हत्या चोरीच्या उद्देशाने

आरोपीची कबुली । पोलिस अधिक्षक राकेश ओला यांची माहिती 

शेवगाव । वीरभूमी - Jun 25, 2023 • 06:21 PM 15002 views

शेवगाव शहरातील आडत व्यापारी गोपीकिशन बलदवा (वय 48) व त्यांच्या भावजयी पुष्पा बलदवा (वय 60) यांची हत्या ही चोरीच्या उद्देशाने झाल्याचे स्पष्ट झाले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा करणार्‍या एका आरोपीला अटक केली असल्याची माहिती पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अटक केलेल्या आरोपीचे नाव खेडकर टावर चव्हाण (वय 32, रा. म्हारोळा, बिडकिन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आहे. त्याने एकट्याने टाटा एसी या वाहनाने येवून चोरीच्या उद्देशाने बलदवा यांच्या घरात घुसुन दोघांची हत्या करत चोरी केल्याची कबुली दिली आहे.

याबाबत पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी पत्रकार परिषद घेवून याबाबत सविस्तर माहिती दिली. शुक्रवार दि. 23 रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास फिर्यादी सुनिता गोपीकिसन बलदवा (वय 48, रा. मारवाडगल्ली, ता. शेवगांव) यांचे घराचा वरच्या मजल्यावरील लाकडी दरवाजा अनोळखी इसमाने उघडुन आत प्रवेश करुन चोरीच्या उद्देशाने फिर्यादी यांचे पती गोपीकिशन गंगाबिसन बलदवा यांना व जाऊबाई पुष्पा हरीकिसन बलदवा (वय 60) अशा दोघांना कशाने तरी डोक्यात मारून जिवे ठार मारले. तसेच फिर्यादी यांना लोखंडी कटावणी व विटेने मारहाण व जखमी करुन 4 लाख 95 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली होती. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 552/2023 भादंविक 302, 397, 307, 460 प्रमाणे खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी घटनेची माहिती घेवुन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन सदर गुन्हा उघडकिस आणणे करीता आदेश दिले होते.

यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्याचा समांतर तपास करणे करीता तीन वेगवेगळी पथके तयार केली. एका पथकाने शेवगाव शहरातील सीसीटीव्ही फुटेजचे आधारे आरोपीचा माग घेणे तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी करत होते. दोन पथके लगतचे बीड व पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर) परिसरातील संशयीत तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे कामी प्रयत्न करत होते.

नमुद सुचनेप्रमाणे पोनि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि. गणेश वारुळे, हेमंत, थोरात, पोहेकॉ. सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, अतुल लोटके, विजय वेठेकर, दत्तात्रय गव्हाणे, बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना. रविंद्र कडले, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, संदीप दरंदले, संदीप चव्हाण, फुरकान शेख, पोकॉ. रविंद्र घुगांसे, अमृत आढाव, बाळासाहेब खेडकर, जालिंदर माने, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ, प्रशांत राठोड, संदीप पवार, चापोहेकॉ. उमाकांत गावडे, चापोना. भरत बुधवंत व चापोकॉ. अरुण मोरे तसेच शेवगाव पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोकॉ. बाप्पा धाकतोडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करून आरोपींचा शोध घेवून कारवाई करणे बाबत सुचना देवून पथके रवाना केली.

शेवगाव परिसरात फिरुन घटना ठिकाणचे व आजु बाजूचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्या आधारे आरोपीचे वर्णन, आरोपीचे चालण्याची पध्दत (बॉडीलँग्वेज) व त्याने घातलेले कपडे व गुन्हा करण्याची पध्दत या आधारे तीन आरोपींवर लक्ष केंद्रीत केले होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा कडुन माहिती मिळाली की, सीसीटीव्ही फुटेज मधील आरोपी हा खेडकर चव्हाण (रा. बिडकीन, ता. पैठण, जि. संभाजीनगर) हा असुन तो त्यांचे गांवी आहे.

आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि. दिनेश आहेर यांनी तात्काळ प्राप्त माहिती पथकास कळवून पंचाना सोबत घेवून तसेच स्थानिक पोलीसांची मदत घेवुन संशयीत आरोपीचे गावी म्हारोळा, बिडकीन (ता. पैठण) येथे पाठवुन आरोपीचे ठावठिकाणाबाबत खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथकाने बिडकीन (ता. पैठण) येथे जावून पोहेकॉ. वाल्मिक निकम (स्थागुशा, छत्रपती संभाजीनगर (ग्रा) यांना मदतीस घेवून संशयीत आरोपीची माहिती घेतली असता सदरचा संशयीत आरोपी हा म्हारोळा, बिडकीन (ता. पैठण) येथे गावात फिरताना मिळुन आला. त्यास शिताफीने ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव खेडकर टावर चव्हाण (वय 32, रा. म्हारोळा, बिडकीन, ता. पैठण) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने टाटा एस. गाडीमध्ये येवून गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.

पुढील तपास शेवगांव पोलीस करीत आहेत. आरोपी खेडकरटावर चव्हाण (रा. बिडकिन) याच्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोक्का, जबरी चोरी, दरोडा, खून असे गंभिर प्रकारचे सात गुन्हे दाखल आहेत. अनेक दिवसापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला शिताफिने अटक करुन 36 तासातच जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक  राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील तसेच परिविक्षाधिन सहाय्यक पोलीस अधिक्षक मा. बी. चंद्रकांत रेड्डी यांचे सुचना व मार्गदर्शना खाली पोनि. दिनेश आहेर, पोनि. विलास पुजारी व सपोनि. पावरा यांनी शेवगाव पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने केली.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply