Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

शेतातून 113 किलो वजनाची 129 गांजाची झाडे जप्त

शेवगाव पोलिसांची कारवाई । एका शेतकर्‍याला मुद्देमालासह अटक

शेवगाव । वीरभूमी - Jul 09, 2023 • 11:12 AM 1994 views

शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथील शेतकरी अरुण बाजीराव आठरे (वय 44 वर्षे, रा. बोरलवण वस्ती, आखतवाडे, ता. शेवगाव) याने आपल्या मोसंबीच्या बागांमध्ये गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती परिविक्षाधिन सहायक पोलिस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांना कळाली. या माहितीची खातरजमा करुन पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकून अरुण बाजीराव आठरे यांच्या शेतातून तब्बल 5 लाख 65 हजार रुपये किंमतीचा 113 किलो वजनाची 129 गांजाची झाडे जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी शेतकरी अरुण बाजीराव आठरे याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेवगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधिन सहायक पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती कळाली की, आखतवाडे येथील बोर लवण वस्ती येथील एका शेतकर्‍याने शेतातील मोसंबीच्या बागेमध्ये गांजाची झाडांची शेती केलेली आहे. या माहितीची खातरजमा करुन सहायक पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी पोनि. विलास पुजारी, सपोनि विश्वास पावरा, सपोनि. आशिष शेळके, पोहेकॉ. परशुराम नाकाडे, चापोहेकॉ. बडे, पोना. उमेश गायकवाड, पोना. सुजित सरोदे, पोकॉ. सुनील रत्नपारखी, पोकॉ. सचिन खेडकर, पोकॉ. एकनाथ गर्कळ, पोकॉ. वैभव काळे, मपोकॉ. रुपाली कलोर यांचे पथक तयार करुन पंचासमक्ष सदरील ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले.

या आदेशानंतर तहसीलदार राहुल गुरव, वजन मापे निरिक्षक अनुप कुलकर्णी यांच्यासह दोन शासकीय पंच, फोटोग्राफर यांना सोबत घेवून सदरील माहितीतील शेतकरी अरुण बाजीराव आठरे (रा. बोरलवण वस्ती, आखतवाडे) या शेतकर्‍याच्या गट नं. 156 मध्ये असलेल्या मोसंबीच्या बागेमध्ये गांजाची झाडे लावली असलेली आढळून आली.

यावेळी सदरील शेतकरी अरुण आठरे याला ‘ही शेती कोणाची आहे? असे विचारले असता त्याने ही माझे मालकीची असून सदर गांजा मी पकवित असल्याचे सांगितले. यावर त्याची झडती घेण्याबाबत विचारले असता त्याने झडतीस नकार दिला. त्यावेळी पोनि. विलास पुजारी यांनी एन.डी.पी.एस. कायदा कलम 50 (1) प्रमाणे अरुण आठरे यास समज पत्र देवून झडती घेतली.

यावेळी मोसंबीच्या बागेमध्ये तब्बल 129 गांजाची झाडे आढळून आली. या झाडांचे वजन मापे निरिक्षक अनुप कुलकर्णी यांच्या समक्ष इलेक्ट्रीक काट्यावर वजन केले असता ते 113 किलो भरले. पोलिसांनी गांजाच्या झाडाच्या मुळाची माती व शेतातील साधी माती याच्यासह 5 लाख 65 हजार रुपये किंमतीची 113 किलो वजनाची 129 गांजाची झाडे जप्त केली.

याप्रकरणी पोलिसांनी पोहेकॉ. परशुराम नाकाडे यांच्या फिर्यादीवरुन शेतकरी अरुण बाजीराव आठरे (वय 44, रा. बोरलवण, आखतवाडे, ता. शेवगाव) याला मुद्देमालासह ताब्यात घेवून त्याच्यावर शासनाने बंदी घातलेल्या गांजाच्या झाडांची बेकायदेशिररीत्या लागवड करुन वाढवलेल्या स्थितीत मिळून आल्याने एन.डी.पी.एस. कायदा सन 1985 चे कलम 20(ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply