Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

अखेर शिंदे गटाला धक्का देत खातेवाटप जाहीर

वाचा संपूर्ण यादी कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते

मुंबई । वीरभूमी - Jul 14, 2023 • 05:20 PM 2249 views

अखेर राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर अपेेक्षेप्रमाणे खाते वाटप झाले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वित्त व नियोजन खाते देण्यात आले असून धनंजय मुंडे यांना अब्दुल सत्तार यांचेकडील कृषी खाते देण्यात आले आहे.

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे  खातवाटपामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग अशी खाती देण्यात आली आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते देण्यात आले आहे.

इतर 26 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे : छगन भुजबळ - अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील - सहकार, राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास, सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय ही खाती देण्यात आली आहेत.

त्याचप्रमाणे - हसन मियाँलाल मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य,  चंद्रकांतदादा बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य. विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास, गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन. गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता, दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण, धनंजय पंडितराव मुंडे - कृषी खाते देण्यात आले आहे.

सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार, संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन, उदय रविंद्र सामंत- उद्योग, प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, रवींद्र दत्तात्रय चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) ही खाती दिली आहेत.

मंत्री अब्दुल सत्तार यांचेकडील काही खाते कपात केली आहेत. तर त्यांचेकडे अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन, दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम - अन्न व औषध प्रशासन, अतुल मोरेश्वर सावे - गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण ही खाते दिली आहेत.

शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क, कु. अदिती सुनिल तटकरे - महिला व बालविकास, संजय बाबुराव बनसोडे - क्रीडा व युवक कल्याण, बंदरे, मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता, अनिल पाटील - मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन ही खाती देण्यात आली आहेत.

अपेक्षेप्रमाणे खाते वाटपामध्ये शिंदे गटाने विरोध केल्यानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यात आले असून अब्दुल सत्तार यांचेकडील कृषी खाते धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply