Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

शेवगाव-पाथर्डी मतदार संघातील या रस्त्यांसाठी निधी मंजूर

आ. मोनिकाताई राजळे यांची माहिती । तब्बल 27 कोटी 50 लाखांचा निधी

पाथर्डी । वीरभूमी- Jul 18, 2023 • 10:09 PM 4163 views

शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांची रुपये 27 कोटी 50 लाख किंमतीची कामे  पुरवणी अर्थसंकल्प जुलै-2023 मध्ये समाविष्ट करण्यात आल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे मतदार संघातील सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती. राज्यात सत्तांतर होऊन भाजपा शिवसेना शासनाच्या कालावधीत राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांच्या कामासाठी मोठा निधी प्राप्त झाला.

या पुरवणी अर्थसंकल्पात पाथर्डी तालुक्यातील प्रजिमा 39 ते तोंडोळी सोनोशी येळी रस्ता मधील किमी 7/00 ते 11/00 मधील रस्ता करणे (रक्कम 300 लक्ष), तिसगाव ते अमरापूर  किमी 0/00 ते 12/800 मधील रस्ता करणे (रक्कम 600 लक्ष), राममा 61 ते अकोला जांभळी खरवंडी किमी 3/00 ते 15/00 रस्ता करणे (रक्कम 600 लक्ष), या कामांचा समावेश आहे.

शेवगाव तालुक्यातील मुंगी ते कोळी वस्ती किमी 10/00 ते 13/00 मधील रस्ता व पुल करणे (रक्कम 200 लक्ष),  शेवगाव पैठण रस्त्यावरील किमी 31/00 ते 36/00 मधील रस्ता करणे (रक्कम 150 लक्ष), तिसगाव शेवगाव पैठण रस्ता किमी 15/600 ते 21/300  मधील रस्त्याची दुरुस्ती करणे (रक्कम 250 लक्ष).

मिरी-माका ते शेवगाव रस्ता किमी 49/600 ते 53/300 मधील रस्त्याची दुरुस्ती करणे (रक्कम 200), खानापूर रावतळे राक्षी रस्ता किमी 1/800 ते 2/160 व किमी 4/300 ते 6/00 मधील रस्त्याची दुरुस्ती करणे (रक्कम 200), नेवासा शेवगाव गेवराई रस्त्यावरील किमी 196/400 ते 201/00 मधील रस्त्याची दुरुस्ती करणे (रक्कम 250), या रस्त्याचा कामांचा समावेश असल्याचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले.

मतदारसंघातील बहुतेक प्रमुख रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून काही रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये तिसगाव-शेवगाव रस्ता, शेवगाव-पैठण रस्ता, शेवगाव-नेवासा रस्ता, शेवगाव-गेवराई रस्ता, पाथर्डीतील कोरडगाव-बोधेगाव रस्ता, पाथर्डी -चिंचपूर रस्त्यांवरील कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.

मतदारसंघातील मुख्य रस्त्यांच्या कामासाठी 27 कोटी 50 लाख रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply