Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

युवकाच्या आत्महत्या प्रकरणाला नवे वळण

मढेवडगाव येथील घटना । संशय व्यक्त करत मालकावरच खुनाचा गुन्हा दाखल

 श्रीगोंदा । वीरभूमी- Jul 19, 2023 • 10:59 AM 1344 views

मढेवडगाव येथील शेतकर्‍याकडे ट्रॅक्टर चालक म्हणून कामाला असलेल्या एरंडोली येथील समाधान अंकुश मोरे (रा. एरंडोली) या युवकाने चार दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर प्राथमिक अहवालात आत्महत्या केल्याचा अहवाल आला होता. मात्र युवकाचे नातेवाईक व एरंडोली ग्रामस्थांनी खुनाचा संशय व्यक्त केल्यामुळे मृतदेहाचे पुन्हा पुणे येथील ससून रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर अहवालात तफावत आढळल्यामुळे ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर मढेवडगाव येथील सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 14 रोजी मढेवडगाव येथील दिलिप गणपत मांडे या शेतकर्‍याकडे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत असलेल्या एरंडोली (ता. श्रीगोंदा) येथील समाधान अंकुश मोरे (वय 19 वर्षे) या तरुणाने दि. 14 रोजी आत्महत्या केली होती. या तरुणाचे श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर प्राथमिक अहवालात आत्महत्या केली असल्याचे निष्पन्न झाले. मात्र तरुणाचे कुटुंबीय व एरंडोली ग्रामस्थांनी खून झाल्याचा संशय व्यक्त करून चार दिवस श्रीगोंदा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्याचा आग्रह धरला.

ग्रामस्थांच्या दबावामुळे श्रीगोंदा पोलिसांनी मृतदेहाचे परत पुणे येथील ससून रुग्णालयात शवविच्छेदन केले. ससून रुग्णालय व श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाच्या अहवालात तफावत आढळल्यामुळे श्रीगोंदा पोलिसांनी मयत तरुणाची आई सौ. रुपाली अंकुश मोरे यांच्या फिर्यादीवरून सोमवार दि. 17 रोजी रात्री दिलीप गणपत मांडे, पाडुंरग उंडे, प्रविण दिलीप मांडे, अभि दिलीप मांडे, बाळासाहेब मांडे, अक्षय त्रिंबक मांडे, आकाश बाळासाहेब मांडे (सर्व रा. मढेवडगाव, ता. श्रीगोंदा) यांच्याविरुद्ध संगनमताने खुन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी समक्ष भेट दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करत आहेत.

वैद्यकिय अधिकारी, पोलिसांवरही नातेवाईकांचा आरोप : श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय आणि पुणे येथील ससून रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर आलेल्या दोन वेगवेगळ्या शवविच्छेदनाच्या अहवालानंतर तरुणाचे नातेवाईक व एरंडोली ग्रामस्थांनी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयातील शव विच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांवर आरोप करत या प्रकरणात आरोपी करण्याची मागणी करत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply