Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

अश्लील व्हिडीओमुळे महिलेची आत्महत्या

शेवगाव येथील घटना । आरोपींवर गुन्हा दाखल

शेवगाव । वीरभूमी - Jul 19, 2023 • 11:18 AM 1754 views

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने शहरातील एका महिलेने रविवार (दि. 16 रोजी सायंकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरुन प्रियकर आरोपीसह एका महिलेवर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आत्महत्या केलेल्या महिलेच्या मुलीनेही अश्लील व्हिडीओची माहिती समजल्यावर शनिवार (दि. 15) विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेतील आरोपीचे नाव प्रशांत घुटे असे आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पतीशी घटस्फोट  झालेल्या संबंधित महिलेशी प्रशांत घुटे याचे प्रेमसंबंध होते. तो तिच्या घरी येत जात होता. दरम्याने आरोपीने महिलेचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले होते.

 दरम्यान, घुटे याचे अन्य एका   महिलेशीही प्रेमसंबंध होते. त्यातच त्या दुसर्‍या महिलेने संबंधित व्हिडिओ अगोदरच्या महिलेच्या भावाच्या मोबाईलवर पाठविले. त्याला घरी बोलावले. परंतु त्याने नकार दिल्याने तिने ‘तुझ्या बहिणीला बदनाम करीन, तिचे जगणे मुश्कील करीन व हे व्हिडीओ सर्वांना दाखवीन, अशी धमकी दिली. त्यानंतर या व्हिडीओबाबत भावाने बहिणीला विचारणा केली, तेव्हा आरोपीने तिचे तसे व्हिडिओ काढल्याची माहिती दिली.

दरम्यान, याची माहिती तिच्या मुलीला समजल्याने तिने शनिवारी विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याच्या त्रासातून संबंधित महिलेने रविवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत तिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी प्रशांत घुटे व त्या दुसर्‍या महिलेविरुद्ध आत्महत्येस  प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply