Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडावे

डॉ. महेश खुस्पे । कोटा एक्सलन्स व काकडे महाविद्यालयाच्यावतीने करिअर मार्गदर्शन परिसंवाद

 शेवगाव । वीरभूमी - Jul 21, 2023 • 12:27 PM 1011 views

विद्यार्थ्यांनी  जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडून त्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक उंचीवर जावे, असे प्रतिपादन कोटा अकॅडमी कराडचे संचालक डॉ. महेश खुस्पे यांनी केले.

शेवगाव येथील कोटा एक्सलन्स सेंटर व आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्यावतीने कर्मयोगी जगन्नाथ कान्होजी उर्फ आबासाहेब काकडे यांच्या 104 व्या जयंती निमित्त इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी करिअर मार्गदर्शन परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. महेश खुस्पे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

यावेळी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष अ‍ॅड.डॉ. विद्याधर काकडे, जि. प. सदस्या हर्षदाताई काकडे, संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. लक्ष्मण बिटाळ, प्राचार्य संपतराव दसपुते, कोटा एक्सलन्स सेंटर शेवगावचे डायरेक्टर हरिष खरड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री. खुस्पे म्हणाले की, यश मिळवण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती, मेहनत, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. विविध विषयांचा अभ्यास करत असताना त्या विषयातील बेसिक माहित असणे गरजेचे असते.

प्रा. खुस्पे यांनी विद्यार्थ्यांना जेईई, नीट, आयआयटी या परीक्षेविषयी मार्गदर्शन केले तसेच दहावी व बारावी नंतर विविध क्षेत्रातील करिअरच्या संधीची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा हर्षदाताई काकडे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कोटा एक्सलन्स सेंटरच्या माध्यमातून करिअरच्या विविध वाटा जाणून घ्याव्यात असे सांगितले.

कार्यक्रमासाठी शेवगाव शहरातील व परिसरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. लक्ष्मण बिटाळ यांनी केले. प्रा. शिवाजी पोटभरे यांनी सूत्रसंचलन करुन आभार मानले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply