Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

नवलेवाडी गावचा ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय

आई वडिलांना सांभाळ न करणार्‍या मुलांची वारस नोंद न करण्याचा ग्रामसभेचा ठराव

 अकोले । वीरभूमी - Jul 21, 2023 • 12:36 PM 1198 views

जो मुलगा अगर मुले आपल्या आई वडिलांना सांभाळत नाही त्या मुलांना आई बापाच्या नावावरील संपत्तीचे वारस होता येणार नाही. जे मुले व  मुली आई-वडिलांना सांभाळतात त्यांनाच बापाच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे वारस म्हणून हक्क मिळतील असा महत्वपूर्ण व क्रांतिकारी ठराव अकोलेजवळील नवलेवाडी ग्रामपंचायतने आज बुधवारी झालेल्या ग्रामसभेत टाळ्यांच्या गजरात  एकमताने संमत केला. या क्रांतिकारी ठरावाचे सर्वत्र कौतुक होत आहे.अन्य ग्रामपंचायतीपुढे नवलेवाडी या क्रांतिकारी गावाने आदर्श निर्माण केला आहे.

नवलेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रा. विकास नवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ग्रामसभा उत्साही वातावरणात काल बुधवारी पार पडली. यासभेतील हा महत्त्वाचा ठराव राज्य शासनाच्या महसूल विभाग व ग्रामविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना पाठवून आजच्या ग्रामसभेत संमत झालेल्या ठरावानुसार महसूल विभागाला वारस ठरवितांना ग्रामपंचायतीकडून संमती घेऊनच वारस प्रकरणे मंजूर करता येतील.

शासकीय सुविधा अगर विविध योजनेचा लाभ आई-वडिलांना मिळेलच पण जे मुले आई-वडिलांना सांभाळ नसतील त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. दिल्यास आई-वडिलांची जबाबदारी सर्वस्वी शासनाकडे राहील असा ठराव ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांनी मांडला. त्यास अ‍ॅड. आनंदराव नवले यांनी अनुमोदन दिले. यावेळी उपस्थित सर्वच नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात या ठरावास आपला पाठींबा दर्शविला.

जलजीवन योजनेअंतर्गत गावातील पिण्याच्या पाण्याची नवी योजना व विशेष उंचीवरील नवीन आरसीसी स्टोअर टँक या कामाच्या मंजुरी बाबतचे तपशील या ग्रामसभेत जिल्हा बँकेचे संचालक व गावचे मार्गदर्शक मधुकरराव नवले यांनी सविस्तर समजावून दिले. ग्रामपंचायत कामाचाही आढावा घेण्यात आला.

सामाजिक पातळीवर मानवी जीवनाला काळीमा फासणार्‍या व कौटुंबिक जीवनात आई-वडिलांना न सांभाळता त्यांचीच वारस मुले-मुली आपल्या स्वतःच्या जीवनात मश्गुल असतात. विशेष म्हणजे वडिलोपार्जित प्रॉपर्टी हिचा उपभोक्त ते घेत असतात. पण आई-वडिलांना मात्र घरातून काढून देऊन म्हातारपणी त्यांच्या पालनपोषणाकडे पूर्णतः दुर्लक्ष करून आजारपणामध्ये ही आर्थिक जबाबदारी न घेता त्यांच्याशी आपल्या जणू काही नातच नाही.

अशा प्रकारे आई-वडिलांना बाजूला ठेवून त्यांचे वारस आज सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपभोगतात. परिणामी म्हातारपण हा शाप ठरला असून म्हातारपणातील वयात आई-वडिलांना जगणे मात्र मुश्किल झाले असल्याने आजच्या सभेत हा महत्वपूर्ण ठराव एकमताने संमत करण्यात आला.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply