Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

चालत्या रिक्षामधून पडल्याने तरुणीचा मृत्यू

एसटी बस स्टॉपवर थांबत नसल्याने 50 टक्के सवलत असतांनाही महिलांना करावा लागतो खाजगी वाहनाने प्रवास

तिसगाव । वीरभूमी - Aug 16, 2023 • 06:44 PM 5019 views

प्रवास करतांना चालत्या अ‍ॅपे रिक्षातून पडल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तिसगाव ते वृद्धेश्वर कारखाना प्रवासा दरम्यान घडली. या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव पुजा प्रकाश थोरात (वय 21, रा. आदिनाथनगर, ता. पाथर्डी) असे आहे.

घटनेनंतर रिक्षा चालक पसार झाला असून पाथर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अ‍ॅपे रिक्षा ताब्यात घेतली आहे. महिलांना एसटी बसने 50 टक्के सवलत दिली असली तरी सध्या बस स्टॉपवरील गर्दी पाहुन एसटी दूर थांबवली जाते. यामुळे महिलांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो.  अवैध वाहतुकीने एका तरुणीचा बळी घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

राज्य शासनाने महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत दिली आहे. त्यातच अधिक महिण्यांमुळे तिर्थस्थळी जाण्यासाठी महिलांची मोठी गर्दी एसटी स्टॉपवर पहायला मिळते. त्यातच आज बुधवारी आमावस्या असल्याने श्रीक्षेत्र मढी, मायंबा येथे भाविकांची मोठी गर्दी होती.

आमावस्यानिमित्त दर्शनासाठी दूरवरुन महिलांसह भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. एसटी प्रवासात महिलांना 50 टक्के सवलत असल्याने बस स्टॉपवर महिलांची मोठी गर्दी असते. यामुळे अनेकवेळा बसमधील गर्दी व स्टॉपवरील गर्दी पाहुन एसटी चालक स्टॉपवर बस न थांबवता दूरवर थांबवतात. यामुळे महिलांना प्रवास करतांना अडचणीचा सामना करावा लागतो.

याचप्रमाणे मयत पुजा प्रकाश थोरात ही नेहमीप्रमाणे तिसगाव येथे कॉम्प्यूटरच्या शिकवणीसाठी गेली होती. शिकवणीनंतर आदिनाथनगर येथे आपल्या घरी येण्यासाठी ती एसटी बसची वाट पहात होती. मात्र बस स्टॉपपासून दूर थांबवली जात होती. तरी कधी गर्दीमुळे बसमध्ये चढता येत नव्हते.

तिसगाव ते आदिनाथनगर हे अंतर 4 किलोमीटरचे आहे. गर्दी व बस थांबत नसल्याने तिने अ‍ॅपे रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तोच प्रवास तिचा अखेरचा ठरला. गर्दीचा फायदा घेत रिक्षा चालकानेही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.

तिसगाव ते आदिनाथनगर (वृद्धेश्वर कारखाना) दरम्यान अ‍ॅपे रिक्षाने प्रवास करत असतांना पुजा थोरात ही चालत्या रिक्षामधून पडल्याने तिचा जागेच मृत्यू झाला. चालकाने ताबडतोब रिक्षा थांबवून घटनेनंतर तेथून पलायन केले.

घटनेची माहिती कळताच पाथर्डी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत रिक्षा ताब्यात घेत पंचनामा केला. मयत पुजा ही वृद्धेश्वर कारखान्याचे कर्मचारी प्रकाश थोरात यांची कन्या आहे. या दुदैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शेवगाव व पाथर्डी आगार व्यवस्थापकांनी एसटी चालकांना स्टॉपवर बस थांबविण्याच्या सुचना द्याव्यात तसेच गर्दी विचारात घेवून जास्तीची गाड्या पाठविण्याची मागणी होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply