Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शेवगावात कांदा निर्यात शुल्क रद्दसाठी स्वाभिमानीचे आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून प्रतिकात्मक आदेशाची होळी

शेवगाव । वीरभूमी - Aug 21, 2023 • 04:22 PM 3002 views

कांद्याचे निर्यात शुल्क रद्द करण्याच्या मागणीच्या पाठपुराव्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोमवारी शेवगाव बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये केंद्र सरकारच्या जाचक निर्णयाच्या प्रतिकात्मक आदेशाची होळी केली. कांदा उत्पादक शेतकर्‍यांना न्याय मिळण्यासाठी तालुक्यातील कांदा  खरेदीदारांनी कांद्याचे लिलाव बेमुदत बंद करण्याच्या मागणीचे निवेदन खरेदीदारांना दिले.

यावेळी कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी केलेल्या केंद्र सरकारच्या विरोधात केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता. यावर्षी शेवगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन झालेले आहे. एप्रिल महिन्यात तालुक्याच्या काही भागात झालेली अतिवृष्टी व त्यानंतर यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात कमी प्रमाणात झालेला पाऊस त्यामुळे कांद्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे काही प्रमाणात चांगला भाव मिळून कांदा उत्पादक शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळण्यास सुरुवात झालेली असताना केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढवल्याने त्याचा फटका थेट कांदा उत्पादक शेतकर्‍यांना बसण्यास सुरुवात झाली आहे.

निर्यात शुल्कच्या आदेशानंतर कांद्याचे भाव कोसळले आहेत. कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून कांद्याची लागवड केली. त्याची निगा ठेवली. मात्र ऐन वेळेस भाव कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना तसेच विविध समस्यांचा सामना करण्याची वेळ आली आहे.

नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, घोडेगाव येथील बाजार समित्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात कांदा खरेदी विक्री बंद आंदोलन पुकारले आहे. त्याच धर्तीवर शेवगाव बाजार समिती व बाजार समितीच्या प्रांगणातील कांदा खरेदीदार व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांच्या बाजूने ठामपणाने उभे राहून कांदा खरेदी विक्री बंद ठेवावी, अशी मागणी करणारे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या वतीने बाजार समितीला देण्यात आले.

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, संतोष गायकवाड, मधुकर पाटेकर यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या आंदोलनात तालुक्यातील बाळासाहेब तेलोरे, संतोष घाडगे, अक्षय लेंडाळ, कांदा खरेदीदार व्यापारी संघटनेचे बापूसाहेब गवळी, राजेंद्र आवटी यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बाजार समितीचे उपसभापती गणेश खंबरे, सचिव अविनाश म्हस्के यांनी निवेदन स्वीकारले. व्यापारी संघटनेचे गवळी यांनी कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या मागणीबाबत व्यापारी संघटना सहमत असून इतर ठिकाणच्या बाजार समितीकडून माहिती घेऊन बाजार समितीच्या प्रांगणात कांदा खरेदी विक्री बाबत शेतकर्‍यांच्या बाजूने योग्य तो निर्णय तातडीने घेण्यात येईल, असे सांगितले.  याबाबत कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या न्याय हक्काबाबत योग्य निर्णय झाला नाहीतर पुकारलेले शेतकरी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी जाहीर केला.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply