Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे चार रस्त्यांच्या कामांना 80 लाखांचा निधी मंजूर

स्नेहलताताई कोल्हे यांनी मानले राज्य सरकारचे आभार

कोपरगाव । वीरभूमी - Sep 25, 2023 • 01:21 PM 1165 views

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-24 मध्ये लेखाशीर्ष 5054 इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरणअंतर्गत कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव ते घोयेगाव, धारणगाव ते ब्राह्मणगाव चौफुली, बहादराबाद ते वेस आणि तळेगाव मळे ते उक्कडगाव या चार रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

या रस्त्यांच्या कामांसाठी राज्य सरकारने एकूण 80 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. त्याबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघातील काही ठिकाणच्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांचे हाल होत असून, दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव ते घोयेगाव (इजिमा 215), धारणगाव ते ब्राह्मणगाव चौफुली (इजिमा 5), बहादराबाद ते वेस (इजिमा 13) आणि तळेगाव मळे ते उक्कडगाव (इजिमा 8) या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने त्या भागातील जनतेची मोठी गैरसोय होत आहे.

या चारही रस्त्यांच्या मजबुतीकरणाचे आणि डांबरीकरणाचे काम तातडीने व्हावे आणि त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करावा म्हणून माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला.

स्नेहलताताई कोल्हे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-24 या आर्थिक वर्षात लेखाशीर्ष 5054 इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरणअंतर्गत या चारही रस्त्यांच्या एकूण 80 लाख रुपये खर्चाच्या मजबुतीकरण आणि डांबरीकरण कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 5054-4542, इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण या लेखाशीर्षअंतर्गत अहमदनगर जिल्हा परिषदेसाठी जिल्ह्यातील विविध भागातील रस्त्यांच्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत एकूण 900 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

शासनाने ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण 5054 अंतर्गत करावयाच्या कामाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शासननिर्णयानुसार सदर लेखाशिर्षांतर्गत जिल्ह्यातील एकूण आठ रस्त्यांच्या कामांना रस्ते विकास योजनेनुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेबाबतचे आदेश अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी काढले आहेत.

या एकूण आठ रस्त्यांच्या कामांचा अंदाजित खर्च एकूण 210 लाख रुपये इतका आहे. त्यामध्ये कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव ते घोयेगाव (इजिमा 215) रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी 20 लाख, धारणगाव ते ब्राह्मणगाव चौफुली (इजिमा 5) रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी 20 लाख, बहादराबाद ते वेस (इजिमा 13) रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी 20 लाख व तळेगाव मळे ते उक्कडगाव (इजिमा 8) या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी 20 लाख रुपये निधीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन या रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे, असे स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले. दरम्यान, या रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने उक्कडगाव, घोयेगाव, धारणगाव, ब्राह्मणगाव, बहादराबाद, वेस, तळेगाव मळे, उक्कडगाव व परिसरातील ग्रामस्थांनी स्नेहलताताई कोल्हे यांचे आभार मानले आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply