Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

चंदन तस्कराला पकडले; दुसरा पसार

95 किलो वजनाचे गाभा असलेले चंदन पोलिसांकडून जप्त । 3 लाख 83 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

 कर्जत । वीरभूमी - Sep 25, 2023 • 01:37 PM 1176 views

कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव शिवारात खातगाव रोडला स्कॉर्पिओ वाहनात चोरीचे चंदन वाहतूक होणार असल्याची माहिती कर्जत पोलिसांना मिळाली. त्यावर छापा टाकला असता 3 लाख 83 हजार रुपये किंमतीची 95 किलो वजनाची चंदनाची गाभा असलेली लाकडे आढळून आली. यावेळी एकास ताब्यात घेण्यात आले असून दुसरा व्यक्ती मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवार, दि. 23 रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास कर्जतचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती समजली की, कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथील खातगाव रोडला काही इसम स्कॉपीओ गाडीमध्ये चंदन चोरुन घेवुन जाणार आहेत.

पोलीस निरीक्षक बळप यांनी तात्काळ गस्तीवर असणार्‍या पथकास याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले. सदरच्या ठिकाणी पोलीस पथकास दोन इसम स्कॉर्पिओ गाडीजवळ उभे दिसले. पोलीस पथक आपल्या दिशेने येत असल्याची चाहूल लागताच गाडी सोडून पळून जाण्याच्या तयारीत असताना वाहनचालकांस शिताफीने पकडण्यात पथकास यश आले.

वाहनचालकांकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याचे नाव महेश हनुमंत गुंड (वय 28, रा. नारायण चिंचोली, ता. पंढरपुर, जि. सोलापुर) असे सांगितले. तसेच त्याचा पळून गेलेला साथीदार याचे नाव दादा निकत (रा. आंबीजळगाव, ता. कर्जत) असे सांगितले. पोलिसांनी पंचासमक्ष वाहनांची तपासणी केली असता 3 लाख 83 हजार रुपये किंमतीची 95 किलो चंदनाची तासलेली गाभ्याची लहान मोठी गोण्यात भरलेली व तासुन निघालेली छिलके मिळून आले.

यासह 4 लाख 50 हजार रुपये किंमतीची स्कॉर्पीओ गाडी असा एकूण 8 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल कर्जत पोलीसांनी जप्त केला.. ताब्यातील आरोपी वाहनचालक महेश गुंड याने दादा निकत याच्याकडुन हा मुद्देमाल विकत घेतला असल्याचे पोलिसांना सांगितले.

महेश गुंड यास चंदन चोरीच्या गुन्ह्यात अटक करुन त्यास न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदरच्या आरोपीकडून कर्जत तालुक्यातील आणखी चंदन चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनशाम बळप, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप बोर्‍हाडे, सहायक फौजदार सलीम शेख, पोलीस अंमलदार श्याम जाधव, सचिन थोरात, लक्ष्मण ढवळे, शकील बेग यांनी पार पाडली.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply