Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पारनेरात आ. निलेश लंके यांचीच जादू

सात पैकी सहा ग्रामपंचायतीवर सरशी । जामगावची सत्ता मनसेने बिनविरोध मिळवली

 लतिफ राजे । वीरभूमी - Nov 07, 2023 • 04:34 PM 1408 views

पारनेर : पारनेर तालुक्यात काल मतदान झालेल्या कान्हूरपठार, जामगाव, वाडेगव्हाण, यादववाडी, मावळेवाडी, विरोली व काकणेवाडी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडूकीत आ. निलेश लंके यांच्या गटाची निवडणुकीत सरशी झालेली दिसून आली आहे. निवडणूक झालेल्या सात पैकी 6 ग्रामपंचायतींवर लंके समर्थकांनी बाजी मारली असून जामगांव ग्रामपंचायतची सत्ता मनसेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब माळी यांनी बिनविरोध मिळविली आहे.

वाडेगव्हाण व कान्हूरपठार ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा निकाल मात्र धक्दाकायक लागला असून चाळीस वर्षानंतर तिथे सत्तांतर झाले आहे. माजी सभापती गणेश शेळके यांना  ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत मोठा धक्का बसला असून त्यांच्या सरपंचपदाच्या उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाल्या आहेत.

कान्हूरपठार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कॉ. आझाद ठुबे गटाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तिथे कान्हूरपठारच्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. वाडेव्हाणमध्ये पंचायत समितीचे माजी सभापती गणेश शेळके यांच्या गटाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. कान्हूरपठार मध्ये संध्या किरण ठुबे 1945 मते (विजयी), रेश्मा सागर व्यवहारे 1,813 पराभूत, शुभांगी बाळसाहेब गुमटकर 75 पराभूत, सविता भास्कर ठुबे 84 पराभूत,  नोटा 20.

वाडेगव्हाणमध्ये प्रियंका किशोर यादव मते 1498 (विजयी) अनिल पवार 94 पराभूत, नंदिनी रामचंद्र शेळके 595 पराभूत, नोटा 10. मावळेवाडीमध्ये कल्याणी कांतीलाल भोसले 400 (विजयी), माधुरी रमेश कुरकुटे 6 पराभूत, नंदा नारायण पठारे 2 पराभूत, रविना सुरेश पठारे 313 पराभूत, नोटा 1. यादववाडीमध्ये  राजेंद्र बाळू शेळके 393 (विजयी), अरविंद नामदेव यादव 348 पराभूत, संतोष तुकाराम यादव 12 पराभूत, जालिंदर एकनाथ शेळके 372 पराभूत, नोटा 3,

 काकणेवाडीमध्ये  अशोक पाराजी वाळुंज 615 (विजयी), जयवंत तुकाराम वाळुंज 489 पराभूत, राहुल पोपट पवार 3 पराभूत, 5 नोटा. वाडेगव्हाण, कान्हूर पठारमध्ये परिवर्तन  कान्हूरपठार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तब्बल 40 वर्षांनंतर सत्तांतर झाले असून कॉ. आझाद ठुबे यांच्या पॅनलला तिथे पराभवाचा सामना करावा लागला आहे. ठुबे गटाचे 7 तर राष्ट्रवादी काँग्रसेचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत.

राष्ट्रवादीच्या सरपंचपदाच्या उमेदवार संध्या किरण ठुबे या विजयी झाल्या. मा. आ. स्व. बाबासाहेब ठुबे हे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांनी स्व. विष्णूपंत व्यवहारे यांच्याकडून ग्रामपंचायतीची सत्ता हिराउन घेतली होती. स्व. ठुबे यांच्या पश्चातही ठुबे गटाच्याच ताब्यात ग्रामपंचातीची सत्ता होती.

तसेच माजी सभापती गणेश शेळके यांना ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत मोठा धक्का बसला असून त्यांच्या सरपंचपदाच्या उमेदवार मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. मतमोजणी नंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोष केला.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply