Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

जेलच्या खिडकीचे गज कापून चार कैदी पळाले

पोलिस प्रशासनात मोठी खळबळ । पळालेले कैदी गंभिर गुन्ह्यातील

संगमनेर । वीरभूमी- Nov 08, 2023 • 12:32 PM 2123 views

संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या जेलच्या खिडकीचे गज कापून चार कैद्यांनी पलायन केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवार दि. 8 नोव्हेंबर रोजीच्या पहाटे साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली आहे.

कैद्यांनी पलायन केल्याच्या घटनेनंतर पोलिसांची विविध पथके त्यांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. पलायन केलेल्या कैद्यामध्ये राहुल काळे, मच्छिंद्र जाधव, रोशन थापा ददेल आणि अनिल काळे यांचा समावेश आहे. जेलमधून पलायन करण्यासाठी आरोपींनी नियोजनबद्ध कट केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वरील चारही आरोपींना संगमनेर जेलमध्ये ठेवण्यात आले होते. नेहमीप्रमाणे जेलच्या बंदोबस्तासाठी तीन पोलिस कर्मचार्‍यांची नेमणुक करण्यात आली होती. दरम्यान आरोपींनी गज कापण्यावेळी मोठ्याने आवाजात गाणे वाजवण्यात आली. या आवाजात खिडकेचे गज कापून आरोपींनी पलायन केले. विशेष म्हणजे याचवेळी बाहेर एक कार उभी होती. त्या कारमधूनच हे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. यामुळे पळून जाण्याचा कट नियोजन बद्ध केल्याचा पोलिसांना संशय आहे.

संगमनेर जेलमध्ये अनेकवेळा क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवले जातात. तसेच जेलमधील कैद्यांना बाहेरचे जेवण, गुटखा, तंबाखू, मोबाईल अशा सुविधा सहजतेने उपलब्ध होतात. यामुळेच जेलमधून पळून जाण्यात चार कैदी यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.

जेलमधून कैदी पळाल्याच्या घटनेनंतर बंदोबस्तावर असलेल्या कर्मचार्‍यांनी याबाबतची माहिती तातडीने वरीष्ठांना कळविली. यानंतर आरोपींच्या शोधासाठी पथके तयार करुन वेगवेगळ्या भागात पाठविली आहेत. मात्र पळून गेलेले कैदी हे गंभिर गुन्ह्यातील आरोपी असल्याने त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान संगमनेर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply