Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

ऊसाला पाच हजाराचा दर मिळविण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवा

रघुनाथदादा पाटील । नेवासा येथे शेतकरी संघटनेची ऊस परिषद

नेवासा । वीरभूमी - Nov 09, 2023 • 12:30 PM 1144 views

आजचे साखरेचे व इथेनॉलचे दर बघता पाच हजार रुपये प्रति टन दर कसा देता येत नाही, याबाबत कारखानदारांनी व सरकारने समोरासमोर बसून चर्चा करावी. राज्यकर्त्यांनी शेतकरी लुटण्यासाठी स्व. शरद जोशींची शेतकरी संघटना फोडून खोत, पाशा पटेल, शेट्टी यांच्यासारख्या नेत्यांना पद, प्रतिष्ठाचे प्रलोभन देऊन शेतकर्‍यांच्या अन्नात माती कालवण्याचे पाप केले. उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी संघर्षाची तयारी ठेवावी, असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केले.

नेवासा येथे अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित ऊस परिषद उत्साहात पार पडली. त्यावेळी रघुनाथदादा पाटील बोलत होते.

यावेळी संघषनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, त्रिंबक भदगले, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, क्रांतिसिंह नाना पाटील, शिवाजी नांदखेले, नरेंद्र काळे, हरिभाऊ तुवर, डॉ. रोहित कुलकर्णी, गणेश चौगुले, बद्री शिंदे, अमृत शिंदे, शिवाजी लाकडे, लक्ष्मण पाटील, बाबासाहेब नागोडे, किरण लंघे, अशोक नागोडे, विश्वास मते, विजय मते, भाऊसाहेब काळे, भारत गुंजाळ, गंगाराम तुवर, सागर लांडे, अ‍ॅड. बाळासाहेब कावळे, सोमनाथ औटी, दत्तात्रय निकम, कैलास नागोडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रघुनाथदादा पाटील म्हणाले, राज्यकर्त्यांच्या नादानपणामुळे शेतकर्‍यांचे प्रश्न बिकट होत चालले आहेत. परिणामी, सिलोन व बीडची पुनरावृत्तीची वाट राज्यकर्त्यांनी पाहू नये. सिलोन व बीडमध्ये राज्यकर्त्यांची घरे जनतेने जाळली. शेतकर्‍यांनी ज्यांच्या खांद्यावर माना टाकल्या, त्यांनीच शेतकर्‍यांच्या माना कापण्याचे कामे केली. त्यामुळे चार मडकी फुटली म्हणून कुंभार रडत बसत नाही, नव्या जोमाने 40 मडके कुंभार तयार करतो. तसे नव्या जोमाने शेतकरी चळवळ वाढवण्याचे काम आम्ही करत आहोत.

कांद्यासारख्या पिकावर काँग्रेसने सातशे रुपये प्रति कि टल निर्यात मूल्य लावले होते. परंतु मोदी सरकारने त्यावर कळस करून आठशे रुपये प्रति क्विटल निर्यात मूल्य लावून कांद्याचे भाव वाढण्याचे काम केले.

यावेळी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे होत असलेली ऊस परिषद राज्याला दिशा देण्याचे काम करणार आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे एक टन उसाचे साखरेचे उपपदार्थाचे सात हजार दोनशे रुपये प्रति टन होतात. तर शेतकर्‍यांना पाच हजार रुपये देण्यास काय अडचण आहे. हवाई अंतराच्या अटीमुळे साखर कारखानदारी मध्ये ठराविक कुटुंबांची मक्तेदारी झाली आहे. बारा वर्षांपूर्वी सोयाबीनचे असलेले दर आजही तेच आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply