Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचार्‍यांना फराळ आणि कपडे वाटप

नगरसेवक प्रसाद ढोकरीकर यांच्यावतीने सन्मान

कर्जत । वीरभूमी - Nov 09, 2023 • 12:34 PM 1035 views

कर्जत शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी कर्जत नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचार्‍यांचा मोठा वाटा असून त्यांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे. गरीब-वंचित कर्मचार्‍यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रसाद ढोकरीकर यांनी मोफत फराळ आणि साडी कपड्याचे वाटप करीत एक  आदर्श पायंडा पाडला. यावेळी कर्जत नगरपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. या भेटवस्तूने स्वच्छता कर्मचारी देखील भारावून गेले होते.

ढोकरीकर परिवाराच्यावतीने कर्जत नगरपंचायतच्या स्वच्छता कर्मचार्‍यांना दिवाळीनिम्मित राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रसाद ढोकरीकर यांनी फराळ व साड्या-कपड्यांचे वाटप केले. बुधवारी आपल्या संपर्क कार्यालयात कर्मचार्‍यांना बोलवत महिला कर्मचार्‍यांना साडी-चोळी आणि पुरुष कर्मचार्‍यांना ड्रेस यासह रोख रक्कम कर्जत नगरपंचायतीच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आली.

यावेळी बोलताना नगरसेवक प्रसाद ढोकरीकर म्हणाले की, कर्जत शहरातील स्वच्छतेसाठी या कर्मचार्‍यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. कर्जत शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी कर्जत नगरपंचायतीचे महिला-पुरुष स्वच्छता कर्मचारी मोठी मेहनत घेतात.

कचरायुक्त,  किळसवाणा, घाणेरडा परिसर अवघ्या काही वेळात स्वच्छ करण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या कार्याने कर्जत शहराची वेगळी ओळख निर्माण झाली असून सन्मान म्हणून दिवाळी भेट देत असल्याचे ढोकरीकर यांनी म्हटले.

यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, गटनेते संतोष मेहेत्रे, उप गटनेते सतीश पाटील, नगरसेवक भास्कर भैलुमे,  पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल, राजेंद्र पवार, युवक शहरचे प्रा. विशाल मेहेत्रे, सुनील शेलार, लालासाहेब शेळके, रवी सुपेकर, भूषण ढेरे, रोहित पवार यांचे स्वीय सहायक बाळासाहेब साळुंके, सोमनाथ गायकवाड, हुजेर काझी यांच्यासह मोठ्या संख्येने स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक भास्कर भैलुमे यांनी केले.

सामाजिक कार्यात ढोकरीकर परिवार कायम अग्रेसर :  आ. रोहित पवार यांनी स्वीकृत नगरसेवकपदी प्रसाद ढोकरीकर यांची नियुक्ती केली. गेली अनेक वर्षांपासून प्रसाद ढोकरीकर विविध सामाजिक कार्यात सहभाग घेत असतात. यासह त्यांनी कर्जत नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागाकरीता स्वताच्या मालकीची जमीन शासनास देणगी स्वरूपात दिली. यासह आपल्या स्वच्छतेच्या आणि वृक्षारोपणाच्या कार्याने जगभरात पोहचलेल्या सर्व सामाजिक संघटनेच्या श्रमप्रेमींचा नुकताच धाकोजी विद्यालयात सन्मानपत्र देत ढोकरीकर कुटुंबियांनी गौरव केला होता.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply