Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पत्नी हरवल्याचे नाटक रचले मात्र पतीच निघाला खुनी

अनैतिक संबंधाचा संशय व्यक्त केल्याने पत्नीचा केला खून

 श्रीगोंदा । वीरभूमी - Nov 18, 2023 • 10:44 PM 1375 views

श्रीगोंदा शहरातून पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव रचून स्वतःच्या अनैतिक प्रेम संबंधात अडथळा ठरणार्‍या पत्नीचा खून करणार्‍या पारगाव येथील ज्ञानदेव आमटे याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने घराजवळ खड्डा करून प्रेत पुरून पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र पोलिसांना संशय आल्याने फिर्यादीची सखोल चौकशी केल्यानंतर फिर्यादीच आरोपी निघाला.

याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दाखल गुन्हानुसार पारगाव येथील ज्ञानदेव पोपट आमटे याचे गावातीलच एका महिलेशी बर्‍याच दिवसांपासून अनैतिक संबंध होते. या बेकायदेशीर प्रेम संबंधाची पत्नी रुपाली आमटे वारंवार चौकशी करत असल्याचा राग येवून ज्ञानदेव याने स्वतःच्या पत्नीला बेदम मारहाण करून तिचा नियोजनबद्ध खून केला.

खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मयत रूपालीचा मृतदेह कापडामध्ये बांधुन घराजवळ खड्डा करून ज्ञानदेव याने पुरला. त्यानंतर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात येऊन मी स्वतः मयत पत्नी रूपालीला चारचाकी गाडीत घेऊन शहरातील एका ब्युटी पार्लर मध्ये सोडुन तिला घेण्यासाठी पुन्हा आलो असता ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. शिवाय घटनेनंतर तो तिला शोधण्यासाठी फिरत होता.

मात्र पोलिस तपासात ज्ञानदेव आमटे यानेच पत्नी रुपाली आमटे हिचा खून केल्याचे निष्पन्न झाले. याबाबत आरोपी ज्ञानदेव पोपट आमटे याच्याविरुद्ध पत्नी रूपालीच्या खुनासह पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी भादंवी कलम 302 व 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मयत रुपाली हिचा भाऊ रोहित संतोष मडके याने फिर्याद दिली आहे. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी ज्ञानदेव पोपट आमटे हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संपत कण्हेरे करीत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply