Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

तिसगावात रास्ता रोको आंदोलन

पाथर्डी, शेवगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासह इतर 12 मागण्यांसाठी आंदोलन

 पाथर्डी । वीरभूमी - Nov 18, 2023 • 11:03 PM 1564 views

पाथर्डी व शेवगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, तसेच मुळा व जायकवाडी धरणाचे पाणी पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील 262 गावांतील शेतीसाठी पाईपलाईनद्वारे मिळावे व इतर बारा मागण्यांसाठी राष्ट्रीय महामार्गावरील तिसगाव बसस्थानक चौकात सुमारे पाऊण तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप यांच्यासह भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड, आम आदमी पार्टीचे सुभाष केकाण, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद सानप, तिनखडीचे सरपंच बाळू खेळकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष देवा पवार, भिलवडेचे सरपंच सुरेश बडे, भारत बडे, सुभाष गायकवाड, सोमनाथ बडे, फैयाज पठाण, भागवत बुधवंत, अक्षय साळवे, गोरक्ष पालवे, अंबादास कारखेले आदींसह तालुक्यातील शेतकरी या रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी तुळशीराम सानप म्हणाले की, पाथर्डी तालुक्यात पिण्यासाठी पाणी, जनावरांच्या चार्‍याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र शासनाने पाथर्डी तालुका दुष्काळी तालुका घोषित न करता तालुक्यातील काही मंडलाचा समावेश दुष्काळजन्य संभाव्य यादीत समावेश केला आहे. मात्र पूर्ण तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती असून शासनाने त्वरीत निर्णय घेऊन  दुष्काळ जाहीर करावा.

तसेच मुळा व जायकवाडीचे पाणी सतत दुष्काळी असलेल्या शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील 262 गावांना पाईपलाईन द्वारे शेतीसाठी मिळावे. यासाठी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यांनीही  त्या निवेदनाची दखल घेत जिल्हा नियोजन च्या बैठकीत हा मुद्दा मांडला. त्यानुसार पालकमंत्री यांनीही शासनाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला असल्याचे सांगितले.

भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे वर्षानुवर्ष जिरायती तालुका म्हणून पाथर्डी, शेवगाव तालुके परिचित आहेत. यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे शेवगाव व पाथर्डी तालुक्यात तीव्र दुष्काळ दुष्काळी परिस्थिती असूनही  दुष्काळी यादीत समावेश होत नाही. याला कुठेतरी लोकप्रतिनिधी जबाबदार असून त्यामुळे तुळशीराम सानप सारख्या शेतकर्‍याला रस्त्यावर उतरावे लागले.

 मी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इथे आलो आहे. याच विषयावर उद्या दिनांक 22 पासुन पाथर्डी शहरातील नाईक चौकात आमरण उपोषण सुरू करणार आहे. शासनाने त्वरित निर्णय घेऊन  पाथर्डी, शेवगाव तालुके दुष्काळी तालुके म्हणुन जाहीर करावेत.

 या वेळी मंडळाधिकारी प्रमोद कटारनवरे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply