Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

आ. राजळेंच्या दिवाळी फराळाला हजारो कार्यकर्त्यांची हजेरी

फराळाबरोबरच नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा । खा. सुजय विखे, आ. राम शिंदेसह भानुदास बेरड, अक्षय कर्डिलेंची उपस्थिती

 पाथर्डी । वीरभूमी - Nov 22, 2023 • 03:31 PM 1387 views

आ. मोनिकाताई राजळे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळ व शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांच्या सत्कार सोहळ्याला भाजपाच्या जिल्ह्यातील नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.  यामुळे कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाचा परिसर गर्दीने फुलून गेला होता.

दीपावली सणानिमित्त आ. मोनिकाताई राजळे यांनी कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या प्रांगणात शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा सत्कार व दीपावली फराळ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या मंडपात आ. मोनिकाताई राजळे यांच्यासह माजी जि. प. सदस्य राहुल राजळे, युवानेते कृष्णा राजळे यांनी स्वागत करुन शुभेच्छांचा स्विकार केला.

यावेळी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी झालेल्या नूतन सरपंच व सदस्यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.  दरम्यान दिवाळी फराळासाठी सर्वात प्रथम माजी मंत्री आ. राम शिंदे यांनी हजेरी लावत आ. राजळे व उपस्थित कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग व कार्यकर्ते उपस्थित होते. दिवाळी फराळ निमित्त स्वादिष्ट्य जेवणाचा आस्वाद घेवून आ. शिंदे तेथून गेल्यावर काही वेळाने दक्षिणचे खा. डॉ. सुजय विखे यांनी हजेरी लावत राहुल राजळे व आ. मोनिका राजळे यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.

यानंतर भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी हजेरी लावत शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रत्येकासाठी स्वादिष्ट्ये जेवणाची व्यवस्था केली होती. शुभेच्छांचा स्विकार आणि नवनिर्वाचितांचा सत्कार यातून वेळ काढत युवानेते कृष्णा राजळे जेवणावळीच्या मंडपात जावून प्रत्येकाची अस्थेवाईपणे चौकशी करत होते.

या कार्यक्रमांसाठी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांसह विष्णुपंत अकोलकर, अभय आव्हाड, बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे, माजी नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, बंडू बोरुडे, महेश बोरुडे, अजय रक्ताटे, सुनील ओव्हळ, वैभव खलाटे, पुरुषोत्तम आठरे, सुनील परदेशी, वृद्धेश्वरचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे, सरपंच चारुदत्त वाघ, संचालक श्रीकांत मिसाळ, पाथर्डी तालुका अध्यक्ष माणिक खेडकर, शेवगाव तालुका अध्यक्ष ताराचंद लोढे, आशाताई गरड, मंगलताई कोकाटे, काशिबाई गोल्हार, श्रीधर देशमुख, भिमराज सागडे, कचरु चोथे,

मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे, माजी नगरसेवक महेश फलके, सागर फडके, कैलास सोनवणे, अमोल गर्जे, बापुसाहेब पाटेकर, जे. बी. वांढेकर, सचिन नेहुल, अजय भंडारी, नंदकुमार शेळके, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार शाम वाडकर, गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, रफिक शेख, अशोक आहुजा यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. राजेंद्र इंगळे व प्रा. किशोर गायकवाड यांनी केले. गर्दीमुळे महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर फुलून गेला होता.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply