Skip to content
Breaking Live
डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले बोधेगावातील त्या खुनाचे रहस्य उलगडले डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले बोधेगावातील त्या खुनाचे रहस्य उलगडले

तहसीलदारांच्या अंगावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

अमरापूर जवळ घडली घटना । शेवगाव पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

शेवगाव । वीरभूमी - Nov 22, 2023 • 05:44 PM 1504 views

शेवगाव तालुक्यात दिवसेंदिवस वाळू तस्करांची मुजोरी वाढत चालली आहे. अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या अंगावर वाळूने भरलेला डंपर खालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी रात्री 10 वाजेच्या दरम्यान अमरापुर जवळ घडली. या घटनेने महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली असून महसूल मंत्र्याच्या जिल्ह्यातच ही घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

याबाबत तहसीलदार प्रशांत मनोहर सांगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलिस ठाण्यात डंपर चालक अन्वर बेग (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) आणि स्कार्पिओ क्र. एमएच 16, सीव्ही 2313 चा चालक यांच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांना मंगळवार दि. 21 रोजी रात्री 8 वाजेच्या दरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, अमरापूर गावाजवळ एक डंपर वाहनातून अवधैरित्या वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती कळाली. या माहितीनुसार अवध वाळू वाहतूक करणार्‍या डंपरवर कारवाई करण्यासाठी तहसीलदार प्रशांत सांगडे हे आपल्या खाजगी गाडीतून अमरापूर येथील बस स्टँड चौकात येवून थांबले.

मिळालेल्या माहितीनुसार एक विना नंबरचा वाळूने भरलेला ढंम्पर तिसगावच्या दिशेने जातांना दिसून आला. सदरील डंपर हा गोपनीय माहितीमधील असल्याची खात्री झाल्यानंतर तहसीलदार सांगडे यांनी डंपरचा पाठलाग करत वाहन थांबवण्याचा इशारा केला. यावर संबधित डंपर चालकाने रस्त्याच्या कडेला डंपर थांबविला.

यावेळी डंपर चालकाला तहसीलदार असल्याचे सांगत त्याला नाव विचारले असता त्याने आपले नाव अन्वर बेग असे सांगितले. सदरच्या वाहनामध्ये विनापरवाना वाळुची चोरटी वाहतूक होत असल्याची खात्री पटल्यानंतर तहसीलदार सांगडे यांनी अमरापुर येथे राहणारे पोलिस हवालदार गरड यांना फोन करुन सदर ठिकाणी बोलावले होते.

त्याचदरम्यान त्या ठिकाणी पांढर्‍या रंगाची स्कार्पिओ (क्र. एमएच 16, सीव्ही 2313) तेथे येवून थांबली. त्यावेळी डंपर चालकाने सांगितले की, डंपर गाडीचे मालक स्कार्पिओ गाडीत आहेत. यावर तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी स्कार्पिओ चालकाला नाव व पत्ता विचारत असतांना तहसीलदारांनी वाहन अडविल्याची खात्री झाल्याने त्याने डंपर चालकाला तहसीलदारांच्या अंगावर गाडी घालण्याचा इशारा करताच डंपर चालकाने तहसीलदार प्रशांत सांगडे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर वेगाने डंपर चालवला. मात्र तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी आपल्या गाडीच्या बाजुला उडी मारल्याने ते बचावले.

यावेळी तहसीलदार यांच्या वाहनाला डॅश मारुन ढंम्पर चालक निघून गेला. तर पोलिस हवालदार गरड घटनास्थळावर येत असल्याचे पाहुन स्कार्पिओ गाडीवरील चालक हा स्कार्पिओ गाडी जागेवर सोडून पळून गेला.

याबाबत तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन डंपर चालक अन्वर बेग (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) आणि स्कार्पिओ क्र. एमएच 16, सीव्ही 2313 वरील चालक (नाव व पत्ता माहित नाही) या दोघा विरोधात भादंवि कलम 307, 353, 379, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 48(7) व 48 (8), पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 चे कलम 3, 15, खाण व खनिज अधिनियमन 1957 चे कलम 4 व 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply