Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

नगरच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करत राहू

खा. सुजय विखे पाटील । दहा वर्ष रखडलेलं नगरकर-करमाळ्याचे रस्त्याचे काम दोन वर्षात पूर्ण केले

श्रीगोंदा । वीरभूमी- Dec 10, 2023 • 02:12 PM 1332 views

नगर ते करमाळा या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली दहा वर्ष रखडलेले होते. मी खासदार झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षात या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण केले असल्याचे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

श्रीगोंदा तालुक्यातील थिटे सांगवी येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी खा. विखे बोलत होते. याप्रसंगी प्रतापभैय्या पाचपुते, सिद्धेश्वर देशमुख, शरद बोटे, डॉ. दिलीप बोस, अर्जुनदेवा शेळके, बलभीम आप्पा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी खा. विखे म्हणाले की, आमदार बबनदादा पाचपुते व माझ्या माध्यमातून थिटे सांगवी या गावात दोन ते अडीच कोटी रुपये मंजूर करून आज या गावामध्ये मी आलो आहे. यापुढेही असेच विकासासाठी कार्यरत राहू अशी ग्वाही यावेळी खासदार विखे यांनी दिली.

तसेच त्याच बजेटमधून श्रीगोंदा मतदारसंघासाठी आमदार बबनदादा पाचपुते यांनी 200 कोटी रुपये रस्त्याच्या कामासाठी मंजूर केले असून ज्येष्ठ आमदार म्हणून मतदारसंघाच्या विकासासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. खासदारकीच्या माध्यमातून काम करत आज विकासाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो आहे, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी स्पष्ट केले.

येणार्‍या नवीन वर्षामध्ये जानेवारी महिन्यात देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे नगर बायपास व नगर-करमाळा राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती खा. सुजय विखे यांनी दिली.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply