Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

आ. राजळेंचे भाषण सुरु असतांनाच भाजपाच्या स्टेजवर ढाकणेंची एंन्ट्री

अकोला येथे खा. सुजय विखे व आ. राजळे यांच्या उपस्थितीत सुरु होता कार्यक्रम 

पाथर्डी । वीरभूमी- Dec 10, 2023 • 10:21 PM 3275 views

भाजपच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांची अचानक एन्ट्री होताच काही सेकंद व्यासपीठावर तणाव पसरला. मात्र ढाकणे यांनी खासदार डॉ. सुजय विखे व आमदार मोनिका राजळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने केलेला सन्मान उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरला. क्षणार्धात तणाव निवळून सर्व मान्यवरांनी जागेवर उभे राहत ढाकणे यांचे विषयी आदर व्यक्त केला. मात्र ढाकणेंची ही गुगली पाथर्डी-शेवगाव मतदार संघासह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे.

तालुक्यातील अकोला गावचे स्व. बबनराव ढाकणे सुपुत्र. देशव्यापी कर्तुत्वाने अकोले गावची ओळख त्यांनी देशाला दिली. ढाकणेंचे अकोला किंवा ढाकण्यांची पाथर्डी अशी ओळख ही तालुक्याकडून काही काळ दिली गेली. शनिवारी गावात खासदार, आमदारांच्या उपस्थितीत कार्यक्रम रंगलेला होता. आमदार मोनिका राजळे यांचे भाषण सुरू असताना अत्यंत दमदारपणे व्यासपीठावर अ‍ॅड. प्रताप ढाकणेंची एन्ट्री झाली. आमदारांनी भाषण थांबवले. सर्वजण सावध होत असतानाच थेट विखेंकडे जात त्यांनी त्यांचा व त्यानंतर आमदार राजळे यांचा शाल देऊन सत्कार केला.

सत्कार केल्यानंतर अ‍ॅड. ढाकणे म्हणाले,  स्व. लोकनेते बाळासाहेब विखे व स्व. बबनराव ढाकणे यांनी नगर दक्षिणेत विकासकामांसाठी सहमती एक्सप्रेस चालवली. संघर्षाचा दोन्ही कुटुंबाचा वारसा असून गेल्या चार दशकांहून अधिक काळ दोन्ही कुटुंबाचे स्नेहाचे संबंध आहेत. खासदार डॉ. विखे यांचे आमच्या गावात प्रथमच आगमन झाले. शिष्टाचाराची परंपरा पाळत स्वागताचा भाग म्हणून गावाच्या वतीने आपण त्यांचे स्वागत केले.

यापूर्वी स्व. बबनराव ढाकणेंनी सुद्धा दुष्काळाच्या साली स्व. बाळासाहेब विखे यांचे स्वागत केले होते. आमदार राजळे यांचे या भागात नेहमीच येणे जाणे असते. सत्कार करून गावासाठी काहीतरी भरीव करण्याची मागणी आपण केली. सध्या माझे दौरे सुरू आहेत. त्या भागातून येताना गावात कार्यक्रम सुरू असल्याचे कळाले. गावाच्या प्रथेप्रमाणे येऊन आपण त्यांचे स्वागत केले. याचा कोणताही राजकीय अर्थ लावू नये. राजधर्म वेगळा असला तरी ग्रामधर्माचे आपण पालन केले. असे ढाकणे म्हणाले.

दरम्यान ढाकणे यांच्या गावकीच्या सत्काराने सत्कारमूर्ती सुद्धा काही क्षण बुचकळ्यात पडले. येत्या काळात होणार्‍या लोकसभा निवडणुकीशी असे संदर्भ जोडले जात आहेत. यापूर्वी अ‍ॅड. ढाकणेही भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. आजही भाजपच्या केंद्रीय नेत्यांपासून जिल्हा पातळीवरील नेत्यांबरोबर त्यांचे सोलोख्याचे संबंध आहेत. अ‍ॅड. ढाकणे यांची सुद्धा लोकसभेचे शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा आहे.

दुसरे इच्छुक उमेदवार आमदार निलेश लंके यांनी तालुक्याचे दौरे वाढवले असले तरी अ‍ॅड. ढाकणे यांच्याशी त्यांचा सतत संपर्क नाही. शेवगाव तालुक्यात सर्वपक्षीय नेत्यांशी विखे यांची वाढलेली जवळीक पाहता अशा नेत्यांना ढाकणे यांनी कृतीतून इशारा दिला आहे. खा. विखे यांनी मात्र या सत्काराला शुभ कौल मानून सत्कार स्वीकारला. आमदार राजळे व अ‍ॅड. ढाकणे यांचे मधील राजकीय वैर कमी झाले असून परस्परांवरील वैयक्तिक टीका त्यांनी कमी केली आहे.

अ‍ॅड. ढाकणे यांची राजकीय गुगली कोणाची व कशी विकेट घेते की त्यांच्या गुगलीवर नेते षटकार ठोकतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नगर लोकसभा मतदार संघासह शेवगाव-पाथर्डी विधानसभेचे राजकीय सामने साखर पेरणीतुन होणार असे चित्र आता स्पष्ट होत आहे.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, ज्येष्ठ नेते काशिनाथ लवांडे व संजय बडे, धनंजय बडे, सरपंच नारायण पालवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply