Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

डोळ्यांत मिरची पुड टाकून भरदुपारी एकाला लुटले

शेवगाव शहरातील घटना । बँकेतून काढलेली 10 लाखांची रक्कम लंपास

 शेवगाव । वीरभूमी - Dec 29, 2023 • 10:01 AM 1874 views

बँकेतून काढलेली 10 लाख रुपयांची रक्कम दुचाकीवरुन घेवून जाणार्‍या एकाच्या डोळ्यात मिरची पुड टाकून व शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटनेने शेवगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी भरदुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास खुंटेफळ रोडवरील जलशुद्धीकरण केंद्रासमोर घडली आहे. या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत शेवगाव पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता. मात्र या घटनेने पुन्हा एकदा पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उभे राहिले असून ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, खुंटेफळ रोडलगत असलेल्या तिरुपती कॉटन इंडस्ट्रीजमधील मॅनेजर विठ्ठल लक्ष्मण सोनवणे (वय 46, रा. शेवगाव) यांनी गुरुवारी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान पाथर्डी रोडवर असलेल्या बडोदा बँकेतून जिनिंगसाठी लागणारी 10 लाख रुपयांची रोख रक्कम काढली. ती रक्कम घेवून ते खुंटेफळ रस्त्याने जिनिंगकडे दुचाकीवरुन जात असतांना जलशुद्धीकरण केंद्राजवळ आल्यानंतर पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी सोनवणे यांना अडवून थांबवले.

सोनवणे यांनी दुचाकी थांबवली असता त्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून दुचाकी ढकलून दिली. तर एकाने तलवारीचा धाक दाखवून त्यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून दोघे चोरटे विनाक्रमांकाच्या दुचाकीवरुन शेवगावच्या दिशेने पसार झाले. यावेळी चोरट्यासोबत झालेल्या झटापटीमध्ये सोनवणे यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावले मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.

विठ्ठल सोनवणे यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात येवून घडलेली हकिगत सांगितली. यानंतर पोलिसांनी बँकेतील व खुंटेफळ रोड परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. दरम्यान खुंटेफळ रस्त्यावरील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेजण काळ्या रंगाच्या विनाक्रमांकाच्या दुचाकीवरुन बँग घेवून जात असल्याचे आढळून आले. मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.

भरदुपारी घडलेल्या या रस्ता लुटीच्या घटनेने शेवगाव पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. विठ्ठल सोनवणे यांनी बँकेतून रक्कम काढल्यानंतर त्यांच्यावर पाळत ठेवून लुटीची घटना घडल्याचा संशय आहे. शस्त्राचा धाक दाखवून रस्ता लुटीची घटना घडल्याने शेवगाव शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे स्पष्ट होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply