Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

महाशिवरात्री यात्रे निमित्त प्रवरा नदीला पाणी सुटणार

पिचड पितापुत्रांच्या पाठपुराव्याला यश

अकोले । वीरभूमी - Mar 06, 2024 • 02:26 PM 2314 views

अकोले येथे महाशिवरात्रीनिमित्त अगस्तीऋषी आश्रमाजवळ यात्रा भरत असते. या यात्रेनिमित्त येणार्‍या भाविकांच्या सुविधेसाठी प्रवरा नदी पात्रात सोडण्याची मागणी माजी मंत्री मधुकरराव पिचड व वैभवराव पिचड यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती. या मागणीची दखल घेत प्रवरा नदी पात्रात गुरुवारी पाणी सोडण्यात येणार आहे. पिचड पितापुत्रांच्या पाठपुराव्याने पाणी सुटणार असल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

अकोले येथील महर्षी अगस्तीऋषी आश्रमाजवळ दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने यात्रा भरत असते. या दिवशी तालुका व तालुक्याबाहेरील लाखो भाविक भक्त अगस्ती ऋषींचे दर्शन घेत असतात. दरवर्षी महाशिवरात्री निमित्त भरणार्‍या यात्रेसाठी प्रवरा नदीला पाणी सोडले जाते. मात्र यावर्षी पाणी सोडण्याचे नियोजन नसल्याने भाविक भक्तांमध्ये नाराजीचा सुर दिसत होता.

त्यामुळे अकोले नगरपंचायतचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उपनगराध्यक्ष शरदराव नवले, नगरसेवक यांनी ही बाब माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या लक्षात आणून दिली. व तसे पत्र ही मा. जिल्हाधिकारी यांना पाठविले.

त्यामुळे माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड यांनी अहमदनगर जिल्ह्याचे पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांचेशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून प्रवरेला पाणी सोडण्यास सांगितले. पालकमंत्री ना. विखे पा. यांनी जिल्हाधिकारी यांना पाणी सोडण्याबाबत सूचना केली. त्यानुसार उद्या गुरुवारी प्रवरा नदीपात्रात  महाशिवरात्री यात्रेनिमित्त पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे भाविक भक्तामध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे.

प्रवरेला पाणी सोडण्यात येणार असल्याने अकोले नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उपनगराध्यक्ष शरदराव नवले व नगरसेवक यांनी पालकमंत्री ना. विखे पा., माजीमंत्री मधुकरराव पिचड आणि माजी आमदार वैभवराव पिचड यांचे आभार मानले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply