Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

लव्ह जिहाद प्रकरणातून मढी गावात तणाव

गावात कडकडीत बंद पाळून पोलिस ठाण्यावर मोर्चा । मुलीला परत देण्याची केली मागणी

 पाथर्डी । वीरभूमी - Mar 07, 2024 • 02:03 PM 3807 views

लव्ह जिहाद प्रकरणातून सक्तीने धर्मांतर घडवून मढी येथील तरुणीला फूस लावून पळून नेत मुस्लिम धर्माच्या पद्धतीने विवाह लावण्याचा प्रकार लक्षात येताच मढीसह परीसरात तणाव पसरून सर्वपक्षीय ग्रामस्थ व विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून पोलिसांना निवेदन दिले. मुलगी परत द्या, अथवा परिणामांना तयार राहा. असा इशारा देत ग्रामस्थांनी मढी गाव बंद ठेवले.

याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी रात्री मढी येथून तरुणीला मुस्लिम समाजातील एका तरुणाने प्रेम प्रकरणातून फूस लावून पळून नेले. तिला त्यांच्या समाजातील नाव देऊन लग्न लावले. दोन दिवसांनी हे जोडपे पोलीस स्टेशनला हजर झाल्यावर ग्रामस्थांना खरा प्रकार कळाला. ग्रामस्थ, नातेवाईक, कुटुंबीय सर्वांनी पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण तणावग्रस्त मनस्थितीतील मुलगी ऐकण्याच्या तयारीत नसल्याने पोलिसांनी तिची रवानगी महिला सुधार गृहात केली. घटनेच्या दुसर्‍या दिवशी रात्री अशाच अन्य एका मुलीला फूस लावून पळवण्याचा प्रकार ग्रामस्थांच्या आक्रमकतेमुळे थांबला.

ग्रामस्थांनी अन्य मार्गाने चौकशी केली असता अन्य काही मुलींचे आधार कार्ड संशयास्पद रित्या बदलण्यात आल्याची माहिती सरपंच संजय मरकड व अन्य ग्रामस्थांना समजली. या घटनेची माहिती पंचक्रोशीतील निवडुंगे, घाटशिरस, तिसगाव, पारेवाडी, मांडवा, शिरापूर, धामणगाव अशा गावांना कळून संपूर्ण परिसर संतप्त  झाला.

भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्या गाडेकर यांनी व इतर संघटनाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री कुटूबीयांची भेट घेऊन ग्रामस्थांकडून माहिती घेतली असता अनेक गंभीर प्रकार पुढे आले.

बुधवारी सकाळी ग्रामस्थ, सकल हिंदू समाज व अन्य संघटनाच्या पुढाकाराने मढी येथे ग्रामसभा घेतली. यामध्ये विविध ग्रामस्थांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया नोंदवून आक्रमकपणे उत्तर देण्याचे धोरण ठरवण्याचा आग्रह धरला. हिंदूंच्या आया बहिणींची अब्रू सुरक्षित नसेल तर आपण बांगड्या भरल्या नाहीत, धर्मांतराचा अत्यंत गंभीर प्रकार तालुक्यात होऊनही प्रशासन स्वस्थ आहे. देवस्थानच्या इनामी जमिनी देवस्थान समितीकडे अथवा ग्रामपंचायत तिकडे वर्ग करून घ्याव्यात. संबंधित लोकांविरुद्ध आर्थिक देवाणघेवाण बंद करावी. सक्तीने धर्मांतर करून तरुणीला काहीतरी प्रकाराने भ्रमित केले आहे.

या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी. तिसगाव येथे कार्यक्षम पोलीसासह  वाढीव कर्मचारी कायमस्वरूपी नियुक्त करावेत. रोड रोमिओचा बंदोबस्त करावा. शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळात मढी, मांडवा, देवराई, शिरापूर आदी रस्त्यावर पोलीस गस्त नेमून हायस्कूल चौकातील रोमिओगिरी बंद करावी  यासाठी आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

दुपारी पोलीस स्टेशनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करून माहिती घेतली. यावेळी सरपंच संजय मरकड, माजी सरपंच भगवान मरकड, देविदास मरकड, सुभाष मरकड, दीपक महाराज काळे आदींसह हिंदुत्ववादी संघटना व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी दिलेल्या निवेदनात देशातील धर्मांतर व बळजबरीने विवाह लावण्याचे प्रकारची माहिती देऊन धर्मांतरास कारणीभूत ठरलेल्या लोकांविरोधात कारवाई व्हावी, मुलीचा ताबा पालकाकडे मिळावा. अशी मागणी करून मदरसे अथवा मशिदीतून लव्हजिहाद साठी प्रोत्साहन दिले जाते.

अन्य धर्मीय युवतींना जाळ्यात ओढण्यासाठी मुस्लिम युवकांना वाहने, मोबाईल, आर्थिक रसद पुरवली जाते. कोणत्या जातीच्या मुलीशी लग्न केल्यास किती पैसे मिळतील, याचे दर पत्रक जारी करण्यात आले आहे. पुन्हा एखाद्या युवतीचे अनेक तुकडे होण्याची वाट पाहणार आहात का? असा प्रश्न निवेदनातून विचारण्यात आला आहे.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे म्हणाले की, ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहेत. गावातले वातावरण व परिसरात शांतता ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. कानिफनाथांची यात्रा सुरू होणार असून गुरुवारी यात्रा नियोजनाची बैठक आहे. त्यानंतर हिंदू मुस्लिम समाजातील ग्रामस्थांसह मान्यवराची शांतता समितीची बैठक घेऊ. जातीय सलोखा टीकवावा, तालुक्यातील वातावरण बिघडू देऊ नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply