Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

दत्तात्रय पानसरेही विधानपरिषदेच्या रिंगणात

नाशिक शिक्षक विधानपरिषद निवडणूक ताकतीने लढविण्याची घोषणा । शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविणार

 श्रीगोंदा । वीरभूमी - May 29, 2024 • 12:08 PM 1195 views

नाशिक विभाग शिक्षक विधानपरिषदेची निवडणूक दि. 26 जून 2024 रोजी होत आहे. या विधानपरिषदेसाठी राज्य पणन महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रा. दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे हे इच्छुक असून त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्वसामान्य शिक्षक प्रतिनिधी म्हणुन ही निवडणूक लढविणार व जिंकणार असा निर्धार प्रा. दत्तात्रय पानसरे यांनी केला आहे. या अगोदर विधानसपरिषदेसाठी नगर जिल्ह्यातून विवेक कोल्हे, भाऊसाहेब कचरे, राजेंद्र विखे हेही इच्छुक असून प्रत्येकाने निवडणूक प्रचार सुरु केला आहे. आता पानसरे यांच्या एंन्ट्रीने विधानपरिषद निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

दत्तात्रय पानसरे हे श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील सामान्य शेतकर्‍याचा मुलगा म्हणुन स्वकतृत्त्वाने राजकीय व सामाजिक कार्यात पुढे आलेले नेतृत्व आहे.  त्यांच्यात अकल्पित नेतृत्वगुण, उत्तम प्रतीचे संगठन कौशल्य, धडाडीने काम करण्याची वृत्ती या गुणांमुळे कुठलाही राजकीय वारसा नसताना एक सामान्य शिक्षक ते पंचायत समिती सदस्य, जि. प. सदस्य, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालक, महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ मुंबईचे विद्यमान अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांना काम करण्याची संधी मिळालेली आहे. या पदांवर काम करत असतांना अतिशय अभ्यासपूर्वक विविध प्रश्नांची सोडवणूक करून जनतेला न्याय देण्याचे काम त्यांनी केलेले आहे.

सन 1999 पासुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे व्यवसायिक अभ्यासक्रम देणारे महाविद्यालये अहमदनगर व पुणे जिल्ह्यामध्ये सुरु करून खर्‍या अर्थाने त्यांनी ज्ञानगंगा खेडोपाडी पोहचविण्याचे काम केलेले आहे. त्याअंतर्गत आज राज्यभरातून हजारो विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत असून स्वावलंबी बनून जीवन जगत आहेत.

समाजाला खरी दिशादेणार्‍या शिक्षक बंधू आणि भगिनींचे वर्षानुवर्षापासून शासन दरबारी अनुदान, पेन्शन, नियुक्ती, संचमान्यता, वैद्यकीय प्रतिपूर्ती, शाळाबाह्य कामकाज  असे अनेकविविध  प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी  नाशिक विभागातील अनेक शिक्षक बंधू आणि भगिनींच्या आग्रहाखातर आपण ही विधानपरिषदेची निवडणूक लढवत असल्याचे दत्तात्रय पानसरे यांनी जाहीर केले आहे.

विधानपरिषदेच्या रिंगणात पानसरे यांची एंट्री होणार असल्याने ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असे चित्र आहे. 

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply