Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

अनुष्ठाणास बसलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मढी येथील एकावर गुन्हा दाखल । भाविकांमधून तीव्र नाराजी

तिसगाव । वीरभूमी - Jun 13, 2024 • 12:17 PM 1279 views

पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थानवर अनुष्ठानास बसलेल्या अल्पवयीन मुलीशी ओळख करून चहासाठी तिला घरी बोलावुन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. यातुन ती मुलगी गरोदर राहीली. तिने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून राम कांता मरकड (रा. मढी, ता. पाथर्डी) याच्या विरोधात बलात्कार व बाललैगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडुन समजलेली माहीती अशी की, राहुरी तालुक्यांतील एक अल्पवयीन मुलगी आजारी असल्याने श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थानवर अनुष्ठानास बसली होती. या मुलीशी ओळख करून आरोपी राम कांता मरकड हा दिनांक 15 एप्रिल 2024 चे पुर्वी तिला चहा पिण्यास घरी घेवुन गेला. तिथे तु मला खुप आवडते, माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणुन आरोपीने अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार केला.

सदर प्रकार कुणास सांगीतला तर जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. काही दिवसानंतर पिडीत मुलीच्या पोटात दुखु लागल्याने तिला अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचारासाठी काही चाचण्या केल्या असता, अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे उघड झाले. मुलीच्या घरच्यांनी तिला विश्वासात घेवुन विचारले असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला.

घटना पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी पाथर्डीत येऊन आरोपी राम कांता मरकड याच्या विरोधात बलात्कार व बाललैगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल केला. सपोनि. जगदीश मुलगीर घटनेचा तपास करीत आहेत.

आरोपी हा मढी देवस्थानवर काही काळ अस्थायी स्वरुपात काम करीत होता. त्यामुळे त्याची पिडीत मुलीशी ओळख निर्माण झाली आणि नको तो प्रकार घडला. या प्रकारामुळे मढीसह पंचक्रोशीतील भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

विश्वस्तांतील वादामुळे कामकाजावर नियंत्रण राहीलेले नाही. त्यातुन असे निंदनीय प्रकार करण्याची हिंमत वाढते आहे. मंदिर परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास करून दोषींना शासन व्हावे.           - संजय मरकड, अध्यक्ष, मढी देवस्थान

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply