Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

गोळीबाराच्या घटनेने पाथर्डी तालुका हादरला

एक जण गंभिर जखमी । आरोपी पोलिसांच्या ताब्यात

 पाथर्डी । वीरभूमी - Jun 26, 2024 • 10:33 PM 10885 views

पाथर्डी तालुक्यातील सैदापूर (हत्राळ) गावामध्ये नातेसंबधाच्या वैमनस्यातून माणिक सुखदेव केदार यांच्यावर रिव्हालवरमधून दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी लागून केदार हे जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तर जखमीला पुढील उपचारासाठी नगर येथे पाठविण्यात आले. ही घटना बुधवार दि. 26 रोजी रात्री 8.30 वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेने संपूर्ण पाथर्डी तालुका हादरला असून एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्राकडून समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील येळी येथील सुभाष विष्णू बडे याचे लग्न झाले होते. आठ वर्षानंतर पती-पत्नीमध्ये घटस्फोट झाला होता. त्यानंतर घटस्फोटीत महिलेने सैदापूर (हत्राळ) येथील युवकाशी विवाह केला होता. त्याच रागातून सुभाष बडे यांनी बुधवारी सायंकाळी सैदापूर (हत्राळ) येथील केदार वस्तीवर जाऊन कुटुंबावर सशस्त्र हल्ला केला.

रिव्हालव्हर मधून झाडलेली गोळी माणिक केदार यांच्या छातीच्या खालच्या भागांमध्ये लागली असून त्यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना नगर येथे हलवण्यात आले आहे. सैदापूर (हत्राळ) येथे झालेल्या हल्ल्यानंतर सुभाष बडे याला जमावाने मारहाण केली. यामध्येे त्याच्या डोक्याला मार लागला आहे.

घटनेची माहिती समजतात पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक सचिन लिमकर हे सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले. तेथे सुभाष बडे याला ग्रामस्थांनी बांधून ठेवलेले होते. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत घटनास्थळावरून एक पिस्टल आणि कोयता जप्त केला आहे.

जखमी माणिक केदार यांना नगरला हलवल्यानंतर सुभाष बडे याला देखील पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून नगर येथे हलविले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्ह्याची नोंद झालेली नाही. हल्ल्याचे कारण फिर्याद दाखल झाल्यानंतरच उलगडणार आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply