Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

राष्ट्रवादीच्या 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

नगर शहरासह, अकोले, कोपरगाव मतदार संघाचा समावेश

अहिल्यानगर । वीरभूमी-  Oct 23, 2024 • 01:57 PM 2108 views

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने आज विधानसभेच्या 38 मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यानुसार बारामतीमधून अजित पवार स्वतः निवडणुकीच्या रिंगणात असून नगर शहर संग्राम जगताप, अकोले मधून डॉ. किरण लहामटे व कोपरगाव मधून आशुतोष काळे यांची नावे आहेत.

राष्ट्रवादीने पहिल्या यादीमध्ये विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीमध्ये सामिल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीनुसार जुन्याच चेहर्‍यांना पुन्हा संधी दिली आहे.

पहिल्याच यादीमध्ये बारामतीमधून अजित पवार, येवला ः छगन भुजबळ, आंबेगाव ः दिलीप वळसे-पाटील, कागल ः हसन मुश्रीफ, परळी ः धनंजय मुंडे, दिंडोरी ः नरहरी झिरवाळ, अहेरी ः धर्मराव बाबा आत्राम, श्रीवर्धन ः आदिती तटकरे, अंमळनेर ः अनिल भाईदास पाटील, उदगीर ः संजय बनसोडे, अर्जुनी मोरगाव ः राजकुमार बडोले, माजलगाव ः प्रकाश दादा सोळंके, वाई ः मकरंद पाटील, सिन्नर ः माणिकराव कोकाटे,  खेड आळंदी ः दिलीप मोहिते, अहिल्यानगर शहर ः संग्राम जगताप, इंदापूर ः दत्तात्रय भरणे, अहमदपूर ः बाबासाहेब पाटील, शहापूर ः दौलत दरोडा, पिंपरी ः अण्णा बनसोडे, कळवण ः नितीन पवार.

कोपरगाव ः आशुतोष काळे, अकोले ः डॉ. किरण लहामटे, बसमत ः चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, चिपळूण ः शेखर निकम, मावळ ः सुनील शेळके, जुन्नर ः अतुल बेनके, मोहोळ ः यशवंत विठ्ठल माने, हडपसर ः चेतन तुपे, देवळाली ः सरोज आहिरे, चंदगड ः राजेश पाटील, इगतपुरी ः हिरामण खोसकर, तुमसर ः राजू कारेमोरे, पुसद ः इंद्रनील नाईक, अमरावती शहर ः सुलभा खोडके, नवापुर ः भरत गावित, पाथरी ः निर्मला उत्तमराव विटेकर, मुंब्रा-कळवा ः नजीब मुल्ला असे 38 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply