Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

पोहण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचा बंधार्‍यात बुडून मृत्यू

सामनगाव येथील घटना । संपूर्ण गावावर शोककळा

शेवगाव । वीरभूमी- Oct 24, 2024 • 11:47 PM 2118 views

बंधार्‍यात पोहण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सामनगाव (ता. शेवगाव) येथे घडली. या घटनेमध्ये मयत शिक्षकाचे नाव दिपक सुर्यभान झाडे (वय 48) असे आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून या दुदैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, शेवगाव तालुक्यातील सामनगाव येथून वाहनार्‍या ढोरा नदीवरील बंधार्‍या पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेला आहे. या बंधार्‍याचे नुकतेच सामाजिक संस्थेच्या मदतीने ग्रामस्थांच्या सहकार्यातून खोलीकरण करण्यात आले आहे.

हा बंधारा पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्यानंतर गावातील काही तरुण नित्यनियमाने सकाळी पोहण्यासाठी येतात. नेहमीप्रमाणे दीपक झाडे हे आपल्या मित्रासोबत गुरुवार दि. 24 रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान पोहण्यासाठी गेले होते.

बंधार्‍यानजिक पोहत असतांना ते पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. दिपक झाडे हे गटांगळ्या खात असतांना तेथे उपस्थित असलेल्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने ते पाण्यात बुडाले. तेथे उपस्थित व परिसरातील युवकांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढून शेवगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले. या घटनेने संपूर्ण सामनगाव परिसरावर शोककळा पसरली. या घटनेची माहिती शेवगाव पोलिस ठाण्यात दिल्यानंतर तेथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर मृतदेहाची शेवगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन दुपारी सामनगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयत दिपक सुर्यभान झाडे (वय-48) हे नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

सामनगाव सेवा संस्थेचे चेअरमन व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सुर्यभान झाडे यांचे ते चिरंजीव होत. तर छत्रपती संभाजीनगर येथील भुलतज्ञ डॉ. ज्ञानेश्वर झाडे, माध्यमिक शिक्षक निवृत्ती झाडे व अध्यात्मिक क्षेत्रातील व्याख्याते गणेश महाराज झाडे यांचे ते चुलत भाऊ होत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply