Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

अखेर श्रीगोंदा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला

अनुराधा नागवडे यांची उमेदवारी जाहीर । शिवसेनेची दुसरी यादी प्रसिद्ध

अहिल्यानगर । वीरभूमी- Oct 26, 2024 • 02:28 PM 3485 views

शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आज शनिवारी आणखी 15 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये श्रीगोंदा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडे आला आहे. श्रीगोंद्यातून अनुराधा नागवडे यांना उमेदवारी जाहीर झाली असून समर्थकांकडून जल्लोष साजरा करत आहेत.

नुकतीच राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेवून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर श्रीगोंदा मतदारसंघातून अनुराधा नागवडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती, त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले.

सकाळी काँग्रेसने 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपल्या 15 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये श्रीगोंदा मतदारसंघातून अनुराधा नागवडे यांच्या नावाचा समावेश असून या अगोदर तेथून भाजपाने प्रतिभाताई पाचपुते यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे श्रीगोंद्यातील लढत रंगत होणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी ः  1) धुळे शहर- अनिल गोटे, 2)चोपडा (अज)- राजू तडवी, 3) जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन, 4) बुलडाणा- जयश्री शेळके, 5) दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल, 6) हिंगोली- रूपाली राजेश पाटील, 7) परतूर- आसाराम बोराडे, 8) देवळाली (अजा) योगेश घोलप, 9)कल्याण पश्चिम- सचिन बासरे, 10)कल्याण पूर्व - धनंजय बोडारे, 11) वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव, 12) शिवडी- अजय चौधरी, 13) भायखळा- मनोज जामसुतकर, 14) श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे, 15) कणकवली- संदेश भास्कर पारकर यांच्या नावाचा समावेश आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply