Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

राणी लंकें विरोधात अजित पवारांकडून उमेदवार जाहीर

पारनेर मतदार संघातील लढत रंगणार

अहिल्यानगर । वीरभूमी- Oct 27, 2024 • 01:01 PM 2366 views

राष्ट्रवादी अजित पवार गटाने आज विधानसभा निवडणुकीसाठी चार उमेदवारांची तिसरी याही प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये खा. निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून काशिनाथ दाते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे पारनेर मतदारसंघातील लढत रंगणार आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाने आज चार उमेदवारांची तिसरी यादी प्रसिद्ध केली. या यादीमध्ये गेवराई मधून विजयसिंह पंडित, फलटण मतदारसंघातून सचिन सुधाकर पाटील, निफाड मधून  दिलीपकाका बनकर आणि पारनेर मतदारसंघातून काशिनाथ दाते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

पारनेर विधानसभा मतदार संघात यापुवी महाविकास आघाडीच्यावतीने राणी लंके यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे. यानंतर राणी लंके यांनी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करुन प्रचारालाही सुरुवात केली आहे. महायुतीकडून पारनेर मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष लागले होते.

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पारनेर मतदारसंघातून काशिनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर करण्यात अली आहे. यामुळे येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राणी लंके विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काशिनाथ दाते यांच्यात लढत रंगणार आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काशिनाथ दाते समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी राहीला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply